दडपणाखाली माझी कामगिरी आणखी उत्तम होते, अशी खात्री कारकीर्दीतील दुसऱ्या ऑलिम्पिकसाठी सज्ज होणाऱ्या नेमबाज राही सरनोबतने व्यक्त केला.

‘‘जबाबदारी आणि अपेक्षा यांची जाणीव मला आहे. त्यामुळे दडपणाखाली माझी कामगिरी सुधारते.’’ असे राहीने शनिवारी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या ऑनलाइन कार्यक्रमात सांगितले.

आशियाई सुवर्णपदक विजेती पहिली महिला नेमबाज राही म्हणाली, ‘‘मी माझ्या जर्मनीच्या प्रशिक्षकांसमवेत ऑलिम्पिकची तयारी करीत होते. परंतु त्यांच्याशी करार गतवर्षी ऑलिम्पिकच्या पूर्वतारखांपर्यंत मर्यादित होता. ऑलिम्पिक पुढे ढकलल्यामुळे मी आता समरेश जंग यांच्याकडून मार्गदर्शन धेत आहे.’’

भारताचा ऑलिम्पिक नेमबाज संघ सराव-वजा-स्पध्रेसाठी ११ मे रोजी झ्ॉग्रेबकडे प्रस्थान करील. याच ठिकाणाहून नेमबाजी संघ ऑलिम्पिककरिता थेट रवाना होणार आहे. क्रोएशियात भारतीय संघ ओसिजेक येथे २० मे ते ६ जून या कालावाधीत युरोपियन अजिंक्यपद स्पध्रेत सहभागी होणार आहे. त्यानंतर याच शहरात २२ जून ते ३ जुलै या दरम्यान ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धा होणार आहे. त्यातही भारतीय संघ सहभागी होईल.

नेमबाजी सरावासाठी भारत असुरक्षित -अंजूम

करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्यामुळे भारत वैयक्तिक नेमबाजी सरावासाठी असुरक्षित आहे. त्यामुळे टोक्यो ऑलिम्पिकपर्यंत सरावासाठी क्रोएशियाच अधिक सुरक्षित ठरेल, असे मत नेमबाज अंजूम मुदगिलने व्यक्त केले आहे. ‘‘माझ्याकडे ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्सचे खासगी सराव व्यवस्था नाही. त्यामुळे दिल्ली आणि पुणे हे दोनच पर्याय उपलब्ध होतात. परंतु सद्य:स्थितीत या दोन्ही शहरांसह भारतात नेमबाजी सराव करण्यासारखी स्थिती नाही,’’ असे अंजूम म्हणाली.

भारताचे माजी हॉकीपटू, प्रशिक्षक