नुकतीच भारताने विंडीजविरुद्ध कसोटी मालिका जिंकली. पण या मालिकेसाठी रोहित शर्माला संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे रोहित शर्मा विजय हजारे करंडक खेळण्यात व्यस्त आहे. विजय हजारे करंडकामध्ये तो मुंबईकडून खेळत आहे. यावेळी मुंबई आणि बिहार यांच्यातील सामन्यात एक प्रकार घडला. एका पुरुष चाहत्याने चक्क मैदानावर रोहितचे चुंबन घेतले. फक्त हेल्मेट असल्यामुळे तो काहीसा वाचला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकाराची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. रोहितने या सामन्यात नाबाद ३३ धावांची खेळी साकारत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रोहित जेव्हा २१ धावांवर खेळत होता, तेव्हा हा प्रकार मैदानात घडला. १५वे षटक संपल्यावर रोहित आपल्या सहकाऱ्याला भेटायला जात होता. त्यावेळी एक चाहता मैदानात घुसला आणि रोहितकडे गेला. रोहितला या चाहत्याचा कोणताच अंदाज नव्हता, त्यामुळे सुरुवातीला रोहित बेसावध राहिला. तेवढ्यात त्या चाहत्याने रोहितचे हेल्मेटच्या वरूनच त्याचे चुंबन घेतले.

या प्रकाराची दखल घेत एका वृत्तपत्राने तो फोटो प्रकाशित केला. तेव्हा भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याला टॅग करत रोहितची पत्नी रितिका सजदेह हिने आपल्याला स्पर्धक मिळाला, असे लिहिले आहे.

तिने हा संदेश इंस्टाग्रामच्या Story मध्ये ठेवला होता. या स्टोरीलाही प्रचंड प्रतिसाद मिळाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fan kissed rohit sharma on ground over helmet and wife ritika sajdeh replied on the same
First published on: 16-10-2018 at 15:16 IST