News Flash

Video : भर मैदानात तो कपडे काढून पळत सुटला आणि…

खेळाडू पिचच्या बाजूला पाणी पीत असताना तो चाहता मधूनच नग्न अवस्थेत धावत आला...

क्रिकेट हा Gentleman’s Game मानला जातो. या खेळात गणवेशापासून ते खेळाच्या नियमापर्यंत सारे काही अत्यंत कडक शिस्तीचे असते. एखाद्या खेळाडूने शिस्तभंग केला, तर त्याच्यावर त्यानुसार कारवाईदेखील केली जाते. पण काही वेळा प्रेक्षकांकडूनच खेळात व्यत्यय आणला जातो. सामना सुरु असताना प्रेक्षक पाण्याच्या बाटल्या फेकून सामन्यात व्यत्यय आणायचे. हल्ली चाहते आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला हात मिळवण्यासाठी चक्क मैदानावर धाव घेतानाही पहिले जातात. गेल्याच महिन्यात विजय हजारे चषक स्पर्धेतील एका सामन्यात एका चाहत्याने रोहित शर्माला भेटण्यासाठी ९ फुटांची सुरक्षाजाळी ओलांडली आणि मैदानावर येत त्याचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.

असाच काहीसा पण थोडा वेगळा प्रकार श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात पाहायला मिळाला. हा सामना इंग्लंडने जिंकला. पण या सामन्यात सर्वाधिक चर्चा ही प्रसंगाची झाली. तो चाहता सामन्याच्या दरम्यान चक्क अंगावरील कपडे काढून मैदानावर धावत आला. सर्व खेळाडू पिचच्या बाजूला पाणी पीत असताना तो चाहता त्या साऱ्यांच्या मधून नग्न अवस्थेत धावत आला आणि त्याने काही आक्षेपार्ह कृतीही केली.

त्या चाहत्याने सुरक्षारक्षकांनाही चांगलाच घाम फोडला. अखेर त्यांनी त्या चाहत्याला पकडले आणि मैदानावरून दूर नेले. चाहत्याचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच गाजत आहे. दरम्यान, श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने २११ धावांनी विजय मिळवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2018 2:13 pm

Web Title: fan running on ground nude video goes viral
Next Stories
1 ऑस्ट्रेलियात जाऊन चांगली कामगिरी करणं कायमच आव्हानात्मक – रोहित शर्मा
2 Video : शिखर धवनचा ‘सुपर सेव्ह’, सीमारेषेवर हवेतच अडवला उत्तुंग षटकार
3 ‘मुनाफ पटेलमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकलो’
Just Now!
X