ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक डीन जोन्स यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. IPLमधील एक प्रसिद्ध समालोचक म्हणून भारतीय चाहते जोन्स यांना ओळखायचे. गुरूवारी दुपारच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. “डीन मर्व्हिन जोन्स यांचे आज निधन झाले. अचानक गुरूवारी त्यांना हृदयविकाराच्या झटका आणि त्यांचा मृत्यू झाला. जोन्स यांच्याबाबत आवश्यक ती व्यवस्था करण्यासाठी आम्ही ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तांशी संपर्क साधत आहोत”, अशी माहिती स्टार इंडियाने प्रसिद्धीपत्रकामार्फत दिली.

जोन्स यांच्या निधनाने क्रिकेटविश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जोन्स यांच्या निधनाची बातमी समजताच सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, विरेंद्र सेहवाग, इरफान पठाण यांसह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी आणि चाहत्यांनी ट्विटरवर शोक व्यक्त केला.

इंडियन प्रीमियर लीग (IPL)

सचिन तेंडुलकर-

मुंबई इंडियन्स-

चेन्नई सुपर किंग्ज-

रवि शास्त्री-

हार्दिक पांड्या-

शिखर धवन-

अमोल मुजुमदार-

विराट कोहली-

डेव्हिड वॉर्नर-

आरपी सिंग-

हसन अली-

मोहम्मद कैफ-

विरेंद्र सेहवाग-

अनिल कुंबळे-

इरफान पठाण-

“डीन जोन्स हे दक्षिण आशियामधील क्रिकेटच्या विकासासाठी बराच काळ झटत होते. ते या विभागातील क्रिकेटचे सदिच्छादूत होते. नव्या दमाच्या प्रतिभावान खेळाडूंना शोधणे आणि त्यांच्यातून तरुण नवे क्रिकेटर्स तयार करणे हे त्यांच्या जीवनाचं ध्येय होतं. डीन जोन्स हे एक ‘चॅम्पियन’ समालोचक होते. त्यांच्या समालोचनाच्या खेळकर शैलीने त्यांनी अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवले. जगभरातील त्यांचे कोट्यवधी चाहते आज नाराज असतील आणि त्यांना मिस करत असतील”, अशा शब्दात स्टार इंडियाने डीन जोन्स यांना आदरांजली वाहिली.