27 February 2021

News Flash

माजी रणजीपटूचा करोनाने घेतला बळी

भारतीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदाची धुराही त्यांनी सांभाळली होती.

सोलापूर : माजी रणजीपटू उमेश दास्ताने यांचे करोनामुळे निधन झाले.

सोलापुरातील माजी रणजी क्रिकेटपटू उमेश मनोहर दास्ताने यांचे काल रात्री करोना विषाणूच्या संसर्गामुळे निधन झाले. मध्य रेल्वेतून मुख्य तिकिट निरीक्षकपदावरून ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

उमेश दास्ताने (वय ६४) यांनी १९७७-७८ साली महाराष्ट्र विरूध्द गुजरात रणजी क्रिकेट सामन्यात सर्वप्रथम सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी पंधरा रणजी सामने खेळले होते. उत्कृष्ट फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजीसाठी ते प्रसिध्द होते. रणजीनंतर त्यांनी रेल्वे क्रिकेट संघाकडून खेळायला सुरूवात केली. भारतीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदाची धुराही त्यांनी सांभाळली होती.

चार वर्षापूर्वी ते रेल्वेच्या नोकरीतून निवृत्त झाले होते. पंधरा दिवसांपूर्वी दास्ताने यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी तपासणीदरम्यान त्यांना करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे दिसून आले. उपचार सुरू असतानाच अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2020 8:38 am

Web Title: former ranji trophy player umesh dastane dies due to corona infection at solapur aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 #BoycottIPL…जाणून घ्या सोशल मीडियावर का होतोय आयपीएलला विरोध??
2 ..तर आर्यलडचे क्रिकेटपटूही ‘आयपीएल’मध्ये छाप पाडतील!
3 एफए चषक फुटबॉल स्पर्धा : आर्सेनलला जेतेपद
Just Now!
X