News Flash

आशियाई युवा बॉक्सिंग: भारताच्या चार खेळाडूंना कांस्य

भारताच्या चार बॉक्सिंगपटूंन आशियाई युवा बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदकांवर समाधान मानावे लागले. ही स्पर्धा सुबिक बे (फिलिपाईन्स) येथे आयोजित करण्यात आली होती.

| March 17, 2013 03:04 am

भारताच्या चार बॉक्सिंगपटूंन आशियाई युवा बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदकांवर समाधान मानावे लागले. ही स्पर्धा सुबिक बे (फिलिपाईन्स) येथे आयोजित करण्यात आली होती.
नरिंदर बेरवाल (९१ किलो), ललित प्रसाद (४९ किलो), अभिषेक बेनिवाल (८१ किलो) व अमृतप्रितसिंग (९१ किलोवरील) यांना उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्यांना कांस्यपदक मिळाले. नरेंदर याला उजबेकिस्तानच्या उल्गेबेक मुबीनोव्ह याने ११-८ असे चिवट लढतीनंतर पराभूत केले. बेनिवाल याला कझाकिस्तानच्या एदित ओर्नीबासारोव्ह याने २६-२१ असे हरविले. कझाकिस्तानचा युवा राष्ट्रीय विजेता एबीयेक एर्मेतोव्ह याला अमृतप्रित याने चांगली झुंज दिली मात्र ही लढत अमृत याला १४-१५ अशी केवळ एक गुणाने गमवावी लागली. जपानच्या कोसेई तानाका याने ललित याचा १७-१० असा सहज पराभव केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 3:04 am

Web Title: four indian players won bronze medal
टॅग : Boxing,Sports
Next Stories
1 पाकिस्तानच्या विजयात मोहम्मद इरफान चमकला
2 न्यूझीलंडवर फॉलोऑनची नामुष्की
3 ईडी कोवनचे चॅपेलना प्रत्युत्तर
Just Now!
X