09 August 2020

News Flash

HBD Dhoni : ‘कॅप्टन कूल’साठी ब्राव्होने बनवलं खास गाणं; पाहा VIDEO

धोनीचा भन्नाट डान्स, चिल्लरपार्टीसोबत मजा-मस्ती अन बरंच काही... Video एकदा बघाच

चेन्नई सुपर किंग्ज संघाने २०११ साली IPL च्या लिलाव प्रक्रियेत वेस्ट इंडिजच्या ड्वेन ब्राव्होला विकत घेतले. त्या वर्षी वेस्ट इंडिजचे खेळाडू आंतरराष्ट्रीय सामने असल्याने IPL खेळू शकतील की नाही याबाबत साशंकता होती. लिलाव प्रक्रियेत ख्रिस गेल अनसोल्ड राहिला असल्याने ब्राव्होनेदेखील आशा सोडून दिली होती. पण चेन्नईच्या संघाने २ कोटींच्या मूळ किमतीला ब्राव्होला संघात स्थान दिले. चेन्नईचा हा डाव त्यांच्यासाठी चांगलाच उपयुक्त ठरला. ब्राव्होने त्यानंतर २०१९ च्या IPL पर्यंत चेन्नईकडून १०४ बळी टिपले. इतकेच नव्हे तर सर्वाधिक बळी घेणारा ‘पर्पल कॅप’ विजेता ठरण्याचा बहुमानही त्याने मिळवला. त्याने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की मला धोनीसाठी काही तरी खास करायचं आहे. त्यानुसार धोनीच्या वाढदिवसासाठी चॅम्पियन ब्राव्हो एक खास गाणं घेऊन आला आहे.

ब्राव्होने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर १ व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून ब्राव्होने धोनीवर बनवलेलं चाहत्यांसमोर आणलं आहे. धोनीचा आज (७ जुलै) वाढदिवस असतो. त्या निमित्ताने ब्राव्होने हे पूर्ण गाणं धोनीला गिफ्ट केलं आहे. ब्राव्होने बनवलेल्या या गाण्याचा टीजर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर आता संपूर्ण गाणं ब्राव्होने धोनीला भेट म्हणून दिलं आहे.

या गाण्यात धोनीने जिंकलेल्या तिन्ही ICC स्पर्धांचा उल्लेख आहे. तसेच धोनीची छाप असलेल्या हेलिकॉप्टर शॉटचेही वर्णन आहे. ब्राव्होने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला असून त्यासोबत एक छान संदेशही धोनीसाठी लिहिला आहे. “धोनी, तू जगभरातील अनेक लोकांचा आदर्श आहेस. तुझा वाढदिवस साजरा करण्यासाठी मी, माझा संघ, माझे चाहते आणि तुझे चाहते या साऱ्यांकडून हे हेलिकॉप्टर (गाणं) तुला भेट देत आहे”, अशा शब्दात त्याने धोनीला शुभेच्छा दिल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 8:48 am

Web Title: happy birthday dhoni csk cricketer dwayne bravo gifts helicopter song to ms dhoni as special gift see video vjb 91
Next Stories
1 Birthday Special Blog : या धोनीचं करायचं काय ??
2 जागतिक बॉक्सिंग क्रमवारी : बॉक्सर अमित पांघल अव्वलस्थानी
3 कोहलीवरील आरोप हास्यास्पद – साजदेह
Just Now!
X