08 March 2021

News Flash

बाबा.. ऑन ड्युटी! हार्दिक पांड्याने पोस्ट केला मजेशीर फोटो

पाहा काय आहे हार्दिकचा नवा फोटो

भारताचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टँकोविच यांना गुरूवारी पुत्ररत्न झाले. हार्दिक-नताशा आई-बाबा झाल्याचे हार्दिकने स्वत: ट्विट करून सांगितलं. लॉकडाउन काळात हार्दिकने आपली गर्लफ्रेंड नताशा गरोदर असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चार फोटो पोस्ट करत त्याने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. गुरूवारी दुपारी हार्दिकने बाळाच्या हातात आपला हात असल्याचा गोंडस फोटो पोस्ट करत साऱ्यांना ही गोड बातमी सांगितली.

गुरूवारी हार्दिक बाबा झाल्यानंतर शुक्रवारपासून त्याला वडिलांची कर्तव्य पार पाडण्याची सुरूवात करावी लागली. हार्दिकने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला. त्यात कार चालवत असून बाजूच्या सीटवर डायपरचा बॉक्स ठेवलेला दिसला. त्या फोटोखाली त्याने गर्लफ्रेंड नताशाला टॅग केले. आणि बाळाचे डायपर्स आणतोय असं मजेशीर कॅप्शन लिहिलं.

पाहा तो फोटो –

 

हार्दिकने लॉकडाउनमध्ये आपली गर्लफ्रेंड नताशा गरोदर असल्याची बातमी दिली होती. तेव्हा त्याने तिच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. “मी आणि नताशा आमच्या सहजीवनाचा प्रवास आनंदाने करत आहोत आणि आता तो प्रवास अजूनच आनंददायी होणार आहे. नताशा गरोदर असून आता आम्हा दोघांत लवकरच तिसरा जीव येणार आहे. आम्ही या नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी खूप उत्सुक आहोत. याचसोबत तुम्हा साऱ्यांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहोत”, अशा भावना हार्दिकने व्यक्त केल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 5:25 pm

Web Title: hardik pandya begins fathers duties instagram post photo informs natasa stankovic of babys diapers on the way vjb 91
Next Stories
1 IPL 2020 : तेराव्या हंगामासाठी बीसीसीआयचे कडक नियम, खेळाडूंची ४ वेळा करोना चाचणी
2 तुमच्या नियमाप्रमाणे काम करेन, समालोचनाची संधी द्या ! संजय मांजरेकरांची BCCI ला विनंती
3 विराटला अटक करा; न्यायालयात याचिका दाखल
Just Now!
X