इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी अष्टपैलू हार्दिक पांड्या चेन्नईला विमानाने रवाना झाला. बर्‍याच दिवसांनंतर भारताच्या कसोटी संघात हार्दिकला स्थान मिळाले आहे. त्यामुळे तो चेन्नईला गेला. महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी हार्दिकसोबत त्याचा मुलगा अगस्त्यदेखील दिसला. अगस्त्यबरोबरचा विमानातील फोटो हार्दिकने शेअर केला. हार्दिकने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याचा आणि अगस्त्यचा फोटो पोस्ट केला. त्यासोबत, “माझ्या मुलाचा पहिला विमानप्रवास”, असं झकासपैकी कॅप्शनदेखील त्याने दिलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फोटो पोस्ट केल्यानंतर लगेचच पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडल्याचं दिसून आलं. हार्दिकची पत्नी आणि अगस्त्यची पत्नी नताशाने त्या फोटो अनेक हार्ट्सचे इमोजी पोस्ट केले. तर क्रिकेटपटू कृणाल पांड्या, राशिद खान, अभिनेत्री सोफी चौधरी अशा सेलिब्रिटींनीदेखील अगस्त्यबद्दल प्रेम व्यक्त केलं.

हार्दिकने शेवटचा कसोटी सामना २०१८मध्ये इंग्लंडविरुद्ध साऊथॅम्प्टन येथे खेळला होता. त्यानंतर त्याला कसोटी संघात स्थान मिळाले नाही. २०१९च्या शेवटी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली त्यामुळे तो काही काळ क्रिकेटपासून दूर होता. पण २०२०मधील ऑस्ट्रेलियन दौर्‍यावर त्याचा वन डे आणि टी२० मालिकेत सहभाग होता. या दोन्ही मालिकेत त्याने उत्तम कामगिरी केली. पण कसोटी संघात मात्र त्याला स्थान मिळवता आले नव्हते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardik pandya shares adorable picture as son agastya boards first flight see instagram post vjb
First published on: 28-01-2021 at 18:11 IST