News Flash

हरमनप्रीत कौर भारतीय महिला संघाची नवीन कर्णधार, आफ्रिकेविरुद्ध टी-२० संघाचं नेतृत्व

स्मृती मंधाना भारताची उप-कर्णधार

हरमनप्रीत कौर (संग्रहीत छायाचित्र)

भारतीय महिला संघाची अष्टपैलू खेळाडू हरमनप्रीत कौरकडे भारतीय महिला संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे. आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टी-२० मालिकेत हरमनप्रीत भारतीय महिला संघाचं नेतृत्व करताना दिसेल. १३ फेब्रुवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. हरमनप्रीत कौरसोबत महाराष्ट्राच्या स्मृती मंधानाकडे भारतीय संघाचं उप-कर्णधारपद सोपवण्यात आलेलं आहे.

एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय महिलांचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. इंग्लंडमध्ये पार पडलेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत भारताला अंतिम फेरीत पोहचवणाऱ्या मिताली राजकडे भारताच्या वन-डे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे.

असा असेल भारतीय महिलांचा टी-२० मालिकेसाठीचा संघ –

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उप-कर्णधार), मिताली राज, वेदा कृष्णमुर्ती, जेमिया रॉड्रीग्ज, दिप्ती शर्मा, अनुजा पाटील, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), नुझात परवीन (यष्टीरक्षक), पुनम यादव, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पुजा वस्त्राकर, राधा यादव

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2018 9:28 pm

Web Title: harmanpreet kaur named indian womens cricket captain for t 20 series against south africa
Next Stories
1 २०१८ महिला टी-२० विश्वचषकाचं यजमानपद वेस्ट इंडिजकडे
2 वन-डे मालिकेत भारत पुनरागमन करेल – श्रेयस अय्यर
3 कसोटी पराभवाची बीसीसीआयकडून गंभीर दखल, क्रिकेट प्रशासकीय समिती चाचपणी करणार
Just Now!
X