भुवनेश्वर येथे ३ ते ९ मे या कालावधीत जपानविरुद्ध होणाऱ्या पुरुष हॉकी मालिकेसाठी भारताच्या २४ जणांच्या चमूची घोषणा गुरुवारी करण्यात आली. जूनमध्ये होणाऱ्या एफआयएच हॉकी विश्व लीग उपांत्य फेरीच्या स्पध्रेच्या तयारीसाठी ही मालिका फायदेशीर ठरणार आहे.
संघाबाबत भारतीय संघाचे प्रशिक्षक पॉल व्ॉन अॅस म्हणाले की, ‘‘आगामी मालिकेसाठी संघात आत्मविश्वास दिसत आहे. सुलतान अझलन शाह चषक स्पध्रेत तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले असले तरी त्यांचे मनोबल उंचावले आहे आणि ही मालिका जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. सामन्याची सुरुवात, गती आणि प्रतिस्पर्धी संघावर दडपण या सर्व बाबींवर संघाने अभ्यास केला आहे.’’
भारतीय संघ : गोलरक्षक : पी. श्रीजेश, हरजोत सिंग; बचावपटू : गुरबाज सिंग, रुपिंदर पाल सिंग, बिरेंद्र लाक्रा, कोठाजीत सिंग, व्ही. आर. रघुनाथ, जसजीत सिंग, गुरमेल सिंग, युवराज वाल्मीकी, हरमनप्रीत सिंग; मध्यरक्षक : मनप्रीत सिंग, धरमवीर सिंग, सरदार सिंग, एस. के. थप्पा, चिंग्लेन्साना सिंग कंगुजम, प्रदीप मोर;  आघाडीपटू : एस. व्ही. सुनील, रमणदीप सिंग, आकाशदीप सिंग, मनदीप सिंग, निक्कीन थिम्माइह, सतबीर सिंग, ललित उपाध्याय.