भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूने हाँगकाँग बॅडमिंटन सुपर सीरिजच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. जपानच्या आया ओहोरीचा सिंधूने २१-१४, २१-१७ ने पराभव केला असून उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा सामना चीनच्या अकाने यामागुचीशी होण्याची शक्यता आहे.

हाँगकाँगमधील कोवलून येथे हाँगकाँग बॅडमिंटन सुपर सीरिज सुरु असून या स्पर्धेत गुरुवारी सिंधूचा सामना जपानच्या आया ओहोरीशी होता. सिंधूने एकहाती सामना जिंकला. सिंधूने पहिला सेट २१-१४ ने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये ओहोरीने प्रत्युत्तर दिले. मात्र सिंधूसमोर ती तग धरु शकली नाही. सिंधूने दुसरा सेट २१-१७ ने जिंकला. लागोपाठ दुसऱ्या सामन्यात सिंधूने सरळ दोन गेम्समध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात केली.
द्वितीय मानांकित सिंधूने बुधवारी हाँगकाँगच्या लियुंग येईतवेईवर मात केली होती. २१-१८ आणि २१- १० ने तिले येईतवेईवरचा पराभव केला होता.

एकीकडे सिंधूने विजय मिळवला असला तरी जागतिक रँकिंगमध्ये तिची घसरण झाली आहे. सिंधू गुरुवारी तिसऱ्या स्थानावर घसरली.  तर सायना नेहवालच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे. सायना नेहवाल पुन्हा एकदा टॉप १० खेळाडूंमध्ये सामील झाली आहे.