२७ नोव्हेंबरपासून विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ या मालिकेत ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली या मालिकेत पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर भारतात परतणार आहे. पत्नी अनुष्का शर्माची बाळंतपणात काळजी घेण्यासाठी बीसीसीआयने विराट कोहलीला विशेष रजा मंजूर केली आहे. परंतू विराटच्या या अनुपस्थितीचा ऑस्ट्रेलियातील वाहिनी, Channel 7 ला फटका बसणार आहे.

अवश्य वाचा – गोलंदाज ठरवतील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेचं भवितव्य – झहीर खान

भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वन-डे आणि टी-२० सामन्यांचं प्रेक्षपण करण्याचे हक्क फॉक्स स्पोर्ट्स या वाहिनीकडे आहेत. तर कसोटी मालिकेच्या प्रक्षेपणाचे हक्क हे चॅनल ७ कडे आहेत. फॉक्स स्पोर्ट्स हे पेड चॅनल असून चॅनल ७ हे फ्री टू एअर आहे. ऑस्ट्रेलियन मीडियामध्ये विराट कोहलीच्या नावाला चांगलंच महत्व आहे. दौऱ्याला सुरुवात होण्याआधी दोन्ही वाहिन्या विराट कोहलीच्या नावावर जाहीराती करत आहेत. परंतू विराट कोहलीच्या माघारी परतण्याच्या निर्णयाचा Channel 7 ला मोठा फटका बसणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs Aus : चाहत्यांमध्ये मालिकेची उत्सुकता, दोन वन-डे आणि टी-२० मालिकेची तिकीटं संपली

३ वन-डे आणि ३ टी-२० सामन्यांत विराट भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व करणार आहे. त्यामुळे फॉक्स स्पोर्ट्स वाहिनी विराटच्या नावाचा व खेळाचा वापर करुन अधिकाधिक प्रमोशन करणार. परंतू तुलनेत चॅनल ७ ला फक्त पहिल्या कसोटीपुरतं विराटच्या नावाचा वापर करता येणार आहे. चॅनल ७ ने ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला कसोटी मालिकेच्या प्रक्षेपणाच्या हक्कांसाठी ४५ लाख डॉलर्स दिले आहेत. त्यातच लॉकडाउन काळात सामने रद्द झाल्यामुळे चॅनल ७ ला मोठा आर्थिक फटका बसला. त्यातच विराटच्या कसोटी मालिकेतून माघार घेण्याच्या निर्णयामुळे चॅनल ७ च्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे.