X

Thank You, Jasprit Bumrah! शतक झळकावल्यानंतर कूकने का मानले बुमराहचे आभार?

अखेरच्या कसोटीत भारतावर पराभवाचं सावट

आपल्या कसोटी कारकिर्दीतला अखेरचा सामना खेळणाऱ्या इंग्लंडच्या अॅलिस्टर कूकने शतकी खेळी केली. कूक-रुट जोडीने केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने सामन्यावर आपला वरचष्मा कायम राखला आहे. अखेरच्या सामन्यात शतक झळकावल्यानंतर अॅलिस्टर कूकने जसप्रीत बुमराहचे आवर्जून आभार मानले आहेत.

अवश्य वाचा – Ind vs Eng : अखेरच्या कसोटीत कूकच्या नावावर विक्रमांची नोंद, जाणून घ्या चौथ्या दिवसातले १० विक्रम

९६ धावसंख्येवर फलंदाजी करत असताना अॅलिस्टर कूकने रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर कव्हर्सच्या दिशेने एका धावेसाठी फटका खेळला. या जागेवर क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या जसप्रीत बुमराहने जोरात थ्रो केला, आणि नेमका याचवेळी हा थ्रो कोणत्याही भारतीय खेळाडूला अडवणं जमलं नाही आणि कूकला आयत्या ५ धावा मिळाल्या. बुमराहच्या या ओव्हरथ्रोच्या बळावर कूकने आपल्या अखेरच्या कसोटीत शतकी खेळी केली.

अवश्य वाचा – Ind vs Eng : सचिन, पॉन्टींगला जमलं नाही, ते कूकने करून दाखवलं…

चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर अॅलिस्टर कूकने पत्रकारांशी खास संवाद साधला. “बुमराहने तो ओव्हरथ्रो केल्यानंतर मी चेंडू नेमका कुठे जातोय हे पाहिलंच नव्हतो. चौकार गेला असं समजून मी आनंद साजरा करायला सुरुवात केली होती, तो चेंडू पुजाराने अडवला असता तर माझी चांगलीच फजिती झाली असती. त्यामुळे त्या ओव्हरथ्रोसाठी मला बुमराहचे आभारच मानले पाहिजेत.” या कसोटीत बुमराहने गोलंदाजीदरम्यान मला अनेकदा अडचणीत आणलं होतं, मात्र त्या ओव्हरथ्रोमुळे माझं कामच सोपं झाल्याचं कूक म्हणाला.

  • Tags: ind-vs-eng,