भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेतील कामगिरीच्या कामगिरीच्या जोरावर स्वच्छेने एक संघ निवडला. या संघात सचिनने स्पर्धेतील सर्वोत्तम ११ खेळाडूंना स्थान दिले आहे. महत्वाचे म्हणजे त्याने या संघात भारताचे ५ खेळाडू निवडले असूनही संघाचे नेतृत्व परदेशी खेळाडूकडे दिले आहे. तसेच त्याच्या संघात अनुभवी महेंद्रसिंग धोनीला स्थान देण्यात आलेले नाही.

सचिन तेंडुलकरने निवडलेल्या वन-डे संघाचे नेतृत्व केन विल्यमसन याच्याकडे आहे. विराट कोहलीलादेखील संघात स्थान देण्यात आले आहे, पण त्याला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून निवडण्यात आले आहे. त्याच्याशिवाय सलामीवीर रोहित शर्मा, अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या आणि रवींद्र जाडेजा तर वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह या भारतीयांना स्थान देण्यात आले आहे.

भारतीय रोहित शर्मासोबत सलामीवीर म्हणून जॉनी बेअरस्टोला सलामीवीर निवडले आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर विल्यमसनला स्थान देण्यातआले आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये २ भारतीयांबरोबर शाकिब अल हसन आणि बेन स्टोक्स यांना संधी देण्यात आली आहे. तर वेगवान गोलंदाज म्हणून जोफ्रा आर्चर आणि मिचेल स्टार्क यांना स्थान दिले आहे.

असा आहे तेंडुलकरने निवडलेला संघ –

रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो(यष्टीरक्षक) , केन विल्यमसन (कर्णधार), विराट कोहली, शाकिब अल हसन, बेन स्टोक्स, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, जोफ्रा आर्चर, मिचेल स्टार्क, जसप्रीत बुमराह