न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघाची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. टी-२० मालिका ५-० ने गमावल्यानंतर भारतीय संघाला वन-डे आणि कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. कर्णधार विराट कोहली या मालिकेत संपूर्णपणे अपयशी ठरला. चार डावांमध्ये मिळून विराटला एकदाही २० ही धावसंख्या ओलांडता आलेली नाही.

अवश्य वाचा – ICC Test Ranking : मालिका गमावली, मात्र बुमराहचं स्थान वधारलं

या खराब कामगिरीनंतरही विराटचं आयसीसी कसोटी क्रमवारीतलं दुसरं स्थान कायम राहिलेलं आहे. भारत-न्यूझीलंड ही कसोटी मालिका दोन्ही संघातील गोलंदाजांनी गाजवली….फलंदाजांना यात फारशी चमक दाखवता आलेली नसल्यामुळे विराटने आपलं दुसरं स्थान कायम राखलं आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे चेतेश्वर पुजाराचं या क्रमवारीतलं स्थान दोन अंकांनी वधारलं असून तो सातव्या स्थानावर पोहचला आहे, मात्र अजिंक्य रहाणेच्या स्थानात घसरण झाली असून तो नवव्या स्थानावर घसरला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनच्या कामगिरीतही घसरण झालेली असून तो चौथ्या स्थानावर घसरला आहे.

अवश्य वाचा – BLOG : राईचा पर्वत करायचा नाही पण…