भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेनंतर आयसीसीनं (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. सिडनी आणि ब्रिस्बेन कसोटीत स्फोटक फलंदाजी करणारा भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यानं आयसीसी क्रमवारीत मोठी भरारी घेतली आहे. तर विराट कोहली, रविंद्र जाडेजा आणि अजिंक्य रहाणे यांच्या क्रमवारीत घरसण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन आणि इंग्लंडचा जो रुट यांना क्रमवारीत बढती मिळाली आहे.

सिडनी कसोटीपूर्वी ऋषभ पंत आयसीसी कसोटी क्रमवारीत ४५ व्या स्थानावर होता. तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ३६ आणि दुसऱ्या डावात ९७ धावांची विस्फोटक खेळी केली आहे. या खेळीचा फायदा पंतला झाला आहे. तिसऱ्या कसोटीनंतर २६ व्या क्रमांकावर पंत पोहचला होता. त्यानंतर निर्णायक चौथ्या कसोटी सामन्यात ८९ धावांची खेळी केल्यामुळे १३ अंकाचा फायदा झाला आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीनुसार ऋषभ पंत १३ व्या क्रमांकावर पोहचला आहे. पंतचीही आतापर्यंतची सर्वोत्म क्रमवारी आहे. दौऱ्याच्या सुरुवातीला संघात स्थानही मिळावलं नव्हतं मात्र, दुसऱ्या कसोटीनंतर फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली. आयसीसी क्रमवारीत ऋषभ पंत अव्वल स्थानावर आहे. आयसीसीच्या क्रमवारीवर नजर फिरवल्यास अव्वल १५ फलंदाजांमध्ये पंत वगळता एकही यष्टीरक्षक नाही.

आणखी वाचा- दौरा नाही तर शिकवण… भारतीय संघाकडून शिकता येतील अशा १० गोष्टी

भारताच्या इतर फलंदाजीबाबत बोलायचं झाल्यास अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली यांच्या क्रमारीत घसरण झाली आहे. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावरुन चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. तर रहाणे सातव्या क्रमांकावरुन नवव्या क्रमांकावर पोहचला आहे. चेतेश्वर पुजाराच्या क्रमवारीत एक अंकानी स्थानानी सुधारणा झाली आहे. पुजारा ताज्या क्रमवारीनुसार सातव्या स्थानावर विराजमान आहे. शुबमन गिल ४७ व्या क्रमांकावर आहे. अव्वल दहा फलंदाजामध्ये तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानावर केन विल्यमसन असून दुसऱ्या स्थानावर स्टिव्ह स्मिथ आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर मार्नस लाबुशेन आहे. श्रीलंकावरोधात द्विशतकी खेळी करणाऱ्या जो रुटला सहा स्थानांची बढती मिळाली आहे. रुट सध्या पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे.

आणखी वाचा- ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण केल्यानंतर ड्रेसिंग रूममधील Video आला समोर; शास्त्री गुरुजींनी केलं खेळाडूंचं कौतुक

आणखी वाचा- ऑस्ट्रेलियावरील ऐतिहासिक विजयानंतर ऋषभ पंतची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…

गोलंदाजीच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराह आणि अश्विन यांची एका स्थानानं प्रगती झाली आहे. बुमराह नवव्या तर अश्विन आठव्या स्थानावर विराजमान आहे. पॅट कमिन्स पहिल्या क्रमांकावर आहे. खेळाडूंमध्ये रविंद्र जाडेजा तिसऱ्या आणि अश्विन सहाव्या क्रमांकावर आहे.