इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेला आज दिमाखात सुरुवात झाली आहे. यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सलामीच्या सामन्यात फिरकीपटू इम्रान ताहीरने अनोखा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

पहिलचं षटक फिरकीपटू इम्रान ताहीरला देत डु प्लेसिसने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ताहीरनेही आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत, पहिल्याच षटकात जॉनी बेअरस्टोला माघारी धाडलं. विश्वचषकात पहिलं षटक टाकणारा ताहीर हा पहिला फिरकीपटू ठरला आहे.

यष्टीरक्षक क्विंटन डी-कॉकने जॉनी बेअरस्टोचा झेल घेतला. ताहीरचा विश्वचषकातला हा पहिला बळी ठरला आहे.