‘‘यंदाच्या मोसमात भारतीय संघाने समाधानकारक कामगिरी केली आहे. त्यामुळे आम्ही ट्वेन्टी-२० विश्वचषकातील सर्व सामन्यांमध्ये तशीच कामगिरी कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. कोणतेही नवे प्रयोग करण्याचे आम्ही टाळणार आहोत आणि विजयाची मालिका कायम ठेवणार आहोत,’’ असा विश्वास भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने व्यक्त केला.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याबाबत विराट म्हणाला की, ‘‘आम्ही न्यूझीलंड संघ काय करतोय, यापेक्षा आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करणार करणार आहोत. उत्तम खेळी हे आमचे पहिले उद्दिष्ट आहे. मागील काही महिन्यांत १० सामन्यांत भारत विजयी झाला असल्याने आत्मविश्वास उंचावलेला आहे आणि तो कायम राखण्याचा प्रयत्न असेल. आशिया चषक स्पध्रेत संघाचा चांगला सराव झाला असून सर्व खेळाडू विश्वचषकात आपले योगदान देण्यास उत्सुक आहेत.’’
‘‘भारताचा समावेश असलेल्या ‘ब’ गटातील सर्व संघ तगडे आहेत. मात्र समोर कोणता संघ आहे, याचा फारसा विचार न करता सकारात्मक क्रिकेटचे प्रदर्शन आम्ही करणार आहोत. आमचा उद्देश साफ आहे. आम्हाला विजयी व्हायचे आहे. संघ विजयी झाल्यावर होणारा आनंद मिळवण्यासाठी नसíगक खेळी खेळेन. नव्या दमाच्या गोलंदाजांकडून भरपूर अपेक्षा आहेत. शिवाय जसप्रीत बुमराह, हार्दकि पंडय़ा यांच्यासारख्या खेळाडूंना या विश्वचषकात चांगली कामगिरी करण्यास मोठी संधी आहे. न्यूझीलंडला कमकुवत समजून चालणार नाही. त्यांची विजयी परंपरा संपुष्टात आण्याचा आमचा प्रयत्न असेल.’’