15 August 2020

News Flash

‘विराट’शक्तीपुढे पंजाब नामोहरम

कर्णधार विराट कोहलीने आणखी एका दमदार शतकानिशी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयाचा अध्याय लिहिला.

| May 20, 2016 03:35 am

विराट कोहली

कर्णधार विराट कोहलीने आणखी एका दमदार शतकानिशी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयाचा अध्याय लिहिला. बुधवारी रात्री झालेल्या सामन्यात पावसामुळे डकवर्थ-लुइस नियमाचा वापर करावा लागला. त्यानुसार बंगळुरूने आयपीएल गुणतालिकेतील तळ्याच्या किंग्ज इलेव्हन पंजाबवर ८२ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
डाव्या हाताला झालेल्या दुखापतीची पर्वा न करता कोहलीने यंदाच्या आयपीएलमधील चौथे शतक साकारले आणि एका हंगामात आठशेहून अधिक धावा काढणारा तो पहिला फलंदाज ठरला. १३ सामन्यांत त्याच्या खात्यावर ८६५ धावा जमा आहेत. कोहलीने ५० चेंडूंत १२ चौकार आणि ८ षटकारांसह ११३ धावा केल्या. याशिवाय ख्रिस गेल (७३) सोबत त्याने १४७ धावांची सलामीची भागीदारी केली. त्यामुळे बंगळुरूला १५ षटकांत ३ बाद
२११ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. पावसामुळे हा सामना आधी १५ षटकांचा करण्यात आला.
मग बंगळुरूने पंजाबला १४ षटकांत १२० धावांवर रोखले आणि स्पध्रेतील सातव्या विजयाची नोंद केली. पंजाबकडून वृद्धिमान साहाने सर्वाधिक २४ धावा केल्या. तर बंगळुरूचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलने २५ धावांत ४ बळी घेतले. श्रीनाथ अरविंद आणि शेन वॉटसन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. बंगळुरूने आता १३ सामन्यांत १४ गुण कमवले आहे. कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई इंडियन्स आणि गुजरात लायन्स यांच्या खात्यावरसुद्धा इतकेच गुण आहेत. दरम्यान यंदाच्या हंगामात १३ पैकी केवळ चार सामन्यात विजय मिळवल्याने पंजाबच्या बाद फेरीत आगेकूच करण्याच्या आशा संपुष्टात आल्या. गेल्यावर्षीही गुणतालिकेत त्यांना शेवटचे स्थान मिळाले होते.

संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : १५ षटकांत ३ बाद २११ (विराट कोहली ११३, ख्रिस गेल ७३; संदीप शर्मा १/२९) विजयी वि. किंग्ज इलेव्हन पंजाब : १४ षटकांत ९ बाद १२० (वृद्धिमान साहा २४; युझवेंद्र चहल ४/२५)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2016 3:35 am

Web Title: in shortest format virat kohli is don bradman
टॅग Virat Kohli
Next Stories
1 दिल्लीसाठी निर्णायक लढत
2 भारतीय महिलांचे कांस्यपदक पक्के!
3 सेव्हिला अजिंक्य
Just Now!
X