23 February 2019

News Flash

अखेरच्या सत्रात अफगाणिस्तानचं पुनरागमन, मात्र भारत सामन्यात अद्याप वरचढ! धवनची शतकी खेळी

मुरली विजयची धवनला उत्तम साथ

धवनचा आक्रमक खेळ

चहापानाच्या सत्रानंतर अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी केलेल्या दमदार पुनरागमनानंतर अफगाणिस्तानने पहिल्या कसोटीत पुनरागमन केलं आहे. मात्र भारतीय फलंदाजांनी छोटेखानी भागीदाऱ्या रचत सामन्यावर आपलं वर्चस्व कायम ठेवलं. सलामीवीर शिखर धवन आणि मुरली विजय यांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या दोन सत्रांवर आपलं वर्चस्व कायम राखलं. मात्र यानंतर सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. शिखरने १०७ तर मुरली विजयने १०५ धावांची खेळी केली. मात्र तिसऱ्या सत्रात अफगाणीस्तानच्या गोलंदाजांनी भारताला धक्के देत जमलेली जोडी फोडली. मधल्या फळीत लोकेश राहुलचा अपवाद वगळता एकही फलंदाज मोठी खेळी करु शकला नाही. त्यामुळे भारताचे ६ गडी माघारी परतले. कर्णधार अजिंक्य रहाणेलाही फारशी चमक दाखवता आली नाही. अखेर रविचंद्रन आश्विन आणि हार्दिक पांड्याने अखेरच्या षटकांमध्ये नेटाने फलंदाजी करुन दिवस खेळून काढला.

अफगाणिस्तानकडून यामीन अहमदजाईने २ तर वफादार, मुजीब उर रेहमान आणि राशिद खानने प्रत्येकी १-१ बळी घेतला. भारताचा एक फलंदाज धावबाद झाला. त्यामुळे उद्याच्या दिवसात भारताचे फलंदाज किती धावा काढतात हे पहावं लागणार आहे.

 • पहिल्या दिवसाअखेरीस भारत ३४७ / ६
 • कार्तिक – हार्दिक पांड्या जोडीने संघाचा डाव सावरला
 • चोरटी धाव घेण्याच्या नादात दिनेश कार्तिक धावबाद, भारताचा सहावा गडी माघारी
 • मुजीब उर रेहमानच्या गोलंदाजीवर चेतेश्वर पुजारा माघारी, भारताचा निम्मा संघ बाद
 • राशिद खानने भारताची जमलेली जोडी फोडली, रहाणे पायचीत. चौथा गडी माघारी
 • अजिंक्य रहाणे – चेतेश्वर पुजारा जोडीकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न
 • यामिन अहमनजाईला मिळाली विकेट
 • लोकेश राहुल त्रिफळाचीत, भारताचा तिसरा गडी माघारी
 • भारताचा दुसरा गडी माघारी
 • भारताची जमलेली जोडी फुटली, मुरली विजय वफादारच्या गोलंदाजीवर माघारी
 • शिखर धवनपाठोपाठ सलामीवीर मुरली विजयचं शतक, भारत मजबूत परिस्थितीत
 • पावसाचा जोर ओसरल्यानंतर पुन्हा एकदा खेळाला सुरुवात
 • सामन्यात पुन्हा पावसाची हजेरी, खेळ थांबवला
 • मुरली विजय शतकापासून काही धावा दूर
 • पावसाचा जोर ओसरला, चहापानाच्या सत्रानंतर सामन्याला सुरुवात
 • सामन्यात पावसाचा व्यत्यय, खेळ थांबवला
 • दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी
 • उपहारानंतर मुरली विजयची फटकेबाजी, लोकेश राहुलची विजयला उत्तम साथ
 • मुरली विजय – लोकेश राहुल जोडीने भारताचा डाव सावरला
 • १०७ धावा काढून शिखर धवन माघारी
 • यामिन अहमदजाईच्या गोलंदाजीवर मोहम्मद नाबीने पकडला झेल
 • भारताला पहिला धक्का, शिखर धवन माघारी
 • पहिल्या दिवसाच्या लंच सेशनपर्यंत भारत १५८/०
 • एकमेव कसोटी शिखर धवनचं शतक, भारताची सामन्यावर मजबूत पकड
 • शिखर धवनची मैदानात चौफेर फटकेबाजी
 • भारतीय फलंदाजीसमोर अफगाणिस्तानचे गोलंदाज हतबल
 • भारताने ओलांडला शंभर धावांचा टप्पा
 • शिखर धवनचं आक्रमक अर्धशतक, भारताची भक्कम सुरुवात
 • राशिद खानच्या गोलंदाजीवर शिखर धवनचा हल्लाबोल
 • भारताने ओलांडला ५० धावसंख्येचा टप्पा
 • खेळपट्टीवर जम बसवल्यानंतर दोघांकडूनही अफगाणिस्तानच्या गोलंदाजीवर हल्लाबोल
 • सलामीवीर मुरली विजय-शिखर धवनकडून डावाची सावध सुरुवात
 • ऐतिहासीक कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

First Published on June 14, 2018 9:13 am

Web Title: ind vs afg only test bengaluru day 1 live updates