News Flash

IND vs AUS : भारताला अजुनही मालिका विजयाची संधी – सौरव गांगुली

प्रत्येक खेळाडूने जबाबदारीने खेळ करणं गरजेचं

माजी कर्णधार सौरव गांगुली (संग्रहीत छायाचित्र)

पर्थ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय संघाचं विमान जरा जमिनीवर आलं आहे. दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये काही ठराविक फलंदाजांचा अपवाद वगळता इतरांनी निराशाजनक कामगिरी केली आहे. दोन्ही संघांमधला तिसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्नच्या मैदानावर सुरु होणार आहे. सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाचं पारडं मालिकेत वर असलं तरीही भारताला ही कसोटी मालिका जिंकण्याची संधी असल्याचं, माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटलं आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : शशी थरुरांनी सोडवला भारतीय संघाच्या सलामीच्या जोडीचा प्रश्न…

“भारताला अजुनही मालिका विजयाची चांगली संधी आहे. फक्त संघातले खेळाडू कसा खेळ करतात यावर ते अवलंबून असेल, संघातील 11 ही खेळाडूंनी आपली जबाबदारी ओळखून खेळ करण्याची गरज आहे.” कोलकात्यातील एका शाळेत खासगी कार्यक्रमादरम्यान गांगुली बोलत होता. कोहली आणि पुजाराचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना आपला प्रभाव पाडता आला नसल्याचंही गांगुलीने म्हटलं आहे. यावेळी सौरव गांगुलीने 2020 सालापर्यंत सिलीगुडी येथे आंतरराष्ट्रीय शाळा स्थापन करण्याचीही घोषणा केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2018 3:31 pm

Web Title: ind vs aus india can still win the test series down under says sourav ganguly
Next Stories
1 IND vs AUS : शशी थरुरांनी सोडवला भारतीय संघाच्या सलामीच्या जोडीचा प्रश्न…
2 …नाहीतर विश्वचषकाच्या यजमानपदाचे हक्क गमावून बसाल !
3 मुंबईला धवल कुलकर्णीची उणीव भासणार
Just Now!
X