25 January 2021

News Flash

Video: …अन् ऑस्ट्रेलियन विकेटकीपरलाच झाली धोनीची आठवण, म्हणाला, “मी धोनी इतका…”

स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झालं ऑस्ट्रेलियन विकेटकीपरचं वक्तव्य

जगभरामध्ये भारताचा माजी कर्णधार आणि विकेटकीपर असणारा महेंद्रसिंग धोनी हा त्याच्या चपळतेसाठी ओळखला जातो. स्टम्प्सच्या मागे यष्टीरक्षण करताना वेगाने स्टंम्पींग करण्यात धोनीचा हात कोणीही धरु शकत नाही. जगभरात धोनीच्या याच चपळतेचे आणि स्मार्टनेसचे लाखो चहाते आहेत. धोनीच्या याच खास शैलीची आठवण काल झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात आली आणि तीही थेट ऑस्ट्रेलियन संघाच्या विकेटकीपरला म्हणजेच मॅथ्यू वेडला. धोनी अगदी चपळतेने फलंदांजांना यष्टीचित करण्यात माहीर होता. म्हणजे नजर हटी दूर्घटना घटी असं म्हणता येईल इतक्या वेगाने धोनी फलंदाजांनाही कोणताही संधी न देताना यष्टीचित करायचा. त्याच्या हातांची ही कमाल अनेकदा पहायला मिळाली आहे. धोनीसारखं आपणही स्टम्पिंगच्या कलेमध्ये अव्वल असावं असं प्रत्येक विकेटकीपरला वाटतं.

आणखी वाचा- भारताच्या विजयावर रोहितची प्रतिक्रिया, म्हणाला…

ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर मॅथ्यू वेडलाही धोनीसारखी वेगवान स्टम्पींग करायची इच्छा आहे. मात्र आपण धोनी इतके वेगवान नाहीत, असं प्रांजळ मत वेडनेच व्यक्त केलं. विशेष म्हणजे त्याने केलेलं हे वक्तव्य स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झालं. धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यानंतर भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवन फलंदाजी करत होता. त्यावेळी नवव्या षटकामध्ये धवन यष्टीचित होण्यापासून थोड्यात वाचला. स्टम्पपासूनच खूपच लांब फेकलेल्या चेंडूला कट करुन धाव घेण्याचा धवनचा प्रयत्न होता. यासाठी तो थेट क्रीजबाहेर येऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नात होता. मात्र बॅट आणि बॉलचा संपर्कच झाला नाही आणि चेंडू थेट स्टम्पमागे उभ्या असणाऱ्या वेडच्या हातात गेला. धवनचा पाय हवेत असतानाच आपण त्याला यष्टीचित करावं या हेतून वेडने बेल्स उडवल्या. मात्र वेड बेल्स उडवेपर्यंत बराच वेळ झाला होता. धवनने आपला पाय क्रिजमध्ये टेकवल्यानंतर वेडने बेल्स उडवल्या.

आणखी वाचा- रोहित-बुमराहशिवाय भारतानं टी-२० मालिका जिंकली, पाहा विराट कोहली काय म्हणाला…

त्यानंतर स्वत:च्याच या प्रयत्नावर वेडने स्वत:लाच ट्रोल केलं. तो धवनला, “मी धोनी नाही, धोनी इतका मी चपळही नाही,” असं म्हणाला. त्यानंतर वेड आणि धवन या दोघांसोबत समालोचही मोठ्याने हसू लागले. या संदर्भातील व्हिडीओ क्रिकेट ऑस्ट्रेलियानेच ट्विटवरुन शेअर केला आहे.

एका चहात्याने धोनीने आपल्या हातांची स्टम्पींगमधील कमाल दाखवली होती तेव्हा वेड नॉनस्टायर्स एण्डला होता अशी आठवण करुन देणारा व्हिडीओही या ट्विटवर रिप्लाय म्हणून पोस्ट केलाय.

रविवारी झालेला दुसरा टी-२० सामना भारताने सहा गडी राखून जिंकला. भारताने तीन सामन्यांची टी-२० मालिकेमध्ये २-० ने विजयी आघाडी मिळवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2020 9:01 am

Web Title: ind vs aus not dhoni not quick enough like dhoni says matthew wade scsg 91
Next Stories
1 पांड्याची फलंदाजी पाहून ऑस्ट्रेलियाला आठवला धोनी
2 भारताच्या विजयावर रोहितची प्रतिक्रिया, म्हणाला…
3 रोहित-बुमराहशिवाय भारतानं टी-२० मालिका जिंकली, पाहा विराट कोहली काय म्हणाला…
Just Now!
X