भारतीय संघानं दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मालिका खिशात घातली आहे. रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा सहा गड्यांनी पराभव केला. भारतानं तीन सामन्याची मालिका २-० फरकानं खिशात घातली आहे. भारतीय संघाच्या या विजयाचं सर्वच स्थरातून कौतुक होत आहे. भारतीय संघानं अखेरच्या पाच षटकांत ५४ धावांचा पाऊस पाडला. रोहित शर्मा, शामी आणि बुमराहसारख्या दिग्गज खेळाडूंशिवाय भारातानं हा विजय मिळवल्यामुळे सर्वांना सुखद धक्का बसला आहे. भारतीय संघाच्या विजयानंतर सलामिवीर फलंदाज रोहित शर्मानं ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. रोहित शर्मानं आपल्या ट्विटमध्ये भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.

आयपीएमलमध्ये मुंबई संघाचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माला दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरोधाती मर्यादित सामन्याच्या मालिकेला मुकावं लागलं होतं. भारतीय संघानं टी-२० मध्ये मिळवलेल्या विजयावर रोहित शर्मानं प्रतिक्रिया दिली. रोहित शर्मा आपल्या ट्विटमध्ये म्हणतोय की, ‘भारतीय संघासाठी या मालिकेत हा सर्वात मोठा विजय आहे. ज्या अंदाजात भारतीय संघानं विजय मिळवला पाहून आनंद झाला. प्रत्येकाचं अभिनंदन.’

आणखी वाचा- रोहित-बुमराहशिवाय भारतानं टी-२० मालिका जिंकली, पाहा विराट कोहली काय म्हणाला…

रोहितबाबत सामन्यानंतर विराट काय म्हणाला?
रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यासांरख्या प्रमुख खेळाडूंशिवाय खेळतानाही ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीत टी-२० मालिकेत धूळ चारल्यामुळे मी आनंदित आहे, असे भारताचा कर्णधार विराट कोहलीनं सामन्यानंतर सांगितलं. ” टी-२० मालिकेत संघ बांधणी योग्य प्रकारे जुळून आली आहे. विशेष म्हणजे रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांसारखे आमचे मर्यादित षटकांच्या सामन्यातील प्रमुख खेळाडू या मालिकेत संघाचा भाग नव्हते. तरीही ऑस्ट्रलियाला पराभूत केल्यामुळे मी समाधानी आहे, असं कोहली म्हणाला.’ हार्दिक आता एक परिपक्व खेळाडू म्हणून उद्यास आला आहे. त्यानं सामाना जिंकवूनच पॅव्हेलियनमध्ये परतावे, अशी अपेक्षा संघाला आहे. त्यामुळे ही खेळी त्याला स्वत:लाही सुखावणारी असेल, याची मला खात्री आहे. त्याशिवाय नटराजनच्या समावेशामुळे गोलंदाजांच्या फळीत विविधता निर्माण झाली आहे, असेही कोहलीनं सांगितलं.

आणखी वाचा- पांड्याची फलंदाजी पाहून ऑस्ट्रेलियाला आठवला धोनी

११ तारखेला रोहित शर्माबाबत निर्णय –
११ डिसेंबर रोजी रोहित शर्माची फिटनेस चाचणी होणार आहे. या चाचणीनंतर रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला रवाना होणार की नाही? हे स्पष्ट होईल. भारतीय संघाचा १७ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा फिटनेस चाचणीत पास झाल्यानंतर लगेच ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. कारण, ऑस्ट्रेलियामध्ये दोन आठवड्यांचा क्वारंटाइन वेळ आहे. हा पुर्ण केल्यानंतरच रोहित शर्माला खेळता येणार आहे. त्यामुळे रोहित शर्म फिट झाल्यानंतरही पहिल्या दोन सामन्याला मुकणार आहे.

आणखी वाचा- पांड्या म्हणतो, “सामानावीरचा खरा मानकरी मी नाही, तर…”

दुसऱ्या सामन्यात भारताचा विजय –

ऑस्ट्रेलियाच्या संघाला त्यांच्यात मैदानात मात देत भारताने दुसरा टी२० सामना जिंकला आणि मालिकेत २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली. कर्णधार मॅथ्यू वेडच्या तुफानी ५८ धावा आणि त्याला स्टीव्ह स्मिथने (४६) दिलेली साथ यांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने १९४ धावांची धावसंख्या उभारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवनचं अर्धशतक (५२) आणि हार्दिक पांड्याच्या धडाकेबाज नाबाद ४२ धावांच्या जोरावर भारतीय संघाने सामना ६ गडी राखून जिंकला.