कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने कोलकाता कसोटीच्या पहिल्या दिवशी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. बांगलादेशला पहिल्या डावात १०६ धावांवर बाद केल्यानंतर भारताने पहिल्या दिवसाअखेरीस ३ गड्यांच्या मोबदल्यात १७४ धावांपर्यंत मजल मारली. दिवसाच्या अखेरीस कर्णधार विराट कोहली ५९ तर अजिंक्य रहाणे २३ धावांवर नाबाद खेळत होता. पहिल्या दिवसाअखेरीस भारताने बांगलादेशवर ६८ धावांची आघाडी घेतली आहे. बांगलादेशकडून इबादत हुसेनने २ तर अल-अमिन हुसेनने १ बळी घेतला.

अवश्य वाचा – IND vs BAN : विराटचा विक्रम, अनोखी कामगिरी करणारा पहिला भारतीय कर्णधार

त्याआधी, दुसऱ्या सत्राच्या अखेरीस भारतीय संघाने एका गड्याच्या मोबदल्यात ३५ धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या कसोटीत द्विशतक झळकावणारा मयांक अग्रवाल या कसोटी सामन्यात १४ धावांवर बाद झाला. अल-अमीन हुसेनने त्याला माघारी धाडलं. यानंतर ठराविक अंतराने रोहित शर्माही माघारी परतला. यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांनी संयमी खेळी करत भारताचा डाव सावरला. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. चेतेश्वर पुजाराने ५५ धावा केल्या.

अवश्य वाचा – IND vs BAN : विराट-रोहितच्या शर्यतीत पुन्हा विराटचीच बाजी !

याआधी, कोलकाता कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा कमाल करुन दाखवली. आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या १०६ धावांवर संपवला. इशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद शमी या त्रिकुटाने बांगलादेशच्या डावाला खिंडार पाडत भारतीय संघाचं पारडं जड ठेवलं. इशांतने पहिल्या डावात बांगलादेशचा निम्मा संघ गारद केला. उमेश यादवने ३ तर मोहम्मद शमीने २ बळी घेतले. बांगलादेशकडून सलामीवीर शादमान इस्लमा, अखेरच्या फळीत लिटन दास आणि नईम हसन यांचा अपवाद वगळता एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही. पहिल्या सत्रापर्यंत बांगलादेशचा संघ ६ गड्यांच्या मोबदल्यात ७३ धावांपर्यंत मजल मारु शकला.

अवश्य वाचा – IND vs BAN : इडन गार्डन्सवर भारतीय गोलंदाजांकडून जुन्या कामगिरीची पुनरावृत्ती

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा बांगलादेशचा निर्णय चुकला. १५ धावसंख्येवर इमरुल कायसला माघारी धाडत इशांत शर्माने बांगलादेशला पहिला धक्का दिला. यानंतर बांगलादेशच्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. एकामागोमाग एक फलंदाज विकेट फेकत राहिल्यामुळे बांगलादेशची परिस्थिती बिकट झाली. अवघ्या ३८ धावांवर बांगलादेशचा निम्मा संघ तंबूत परतला होता. उमेश यादव, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी या गोलंदाजांनी भेदक मारा करत बांगलादेशच्या डावाचं कंबरडं मोडलं.

अवश्य वाचा – IND vs BAN : मायदेशात खेळताना इशांतला सूर सापडला, निम्मा संघ केला गारद

Live Blog

20:42 (IST)22 Nov 2019
पहिल्या दिवसाचा खेळ संपला, भारताकडे आघाडी

दिवसाअखेरीस भारत ३ गड्यांच्या मोबदल्यात १७४ धावांपर्यंत मजल

विराट कोहली नाबाद ५९ तर अजिंक्य रहाणे नाबाद २३ धावा

20:05 (IST)22 Nov 2019
विराट कोहलीचं अर्धशतक, भारतीय कर्णधाराचा धडाकेबाज फॉर्म सुरुच

पहिल्या डावात भारताकडे आघाडी

20:04 (IST)22 Nov 2019
अखेर भारताची जमलेली जोडी फुटली, पुजारा माघारी

इबादतच्या गोलंदाजीवर शादमान इस्लामने घेतला पुजाराचा झेल

१०५ चेंडूत ८ चौकारांसह पुजाराच्या ५५ धावा, कोहलीसोबत पुजाराची ९४ धावांची भागीदारी

19:52 (IST)22 Nov 2019
चेतेश्वर पुजाराचं अर्धशतक, भारताचा डाव सावरला

विराट कोहलीसोबत पुजाराची महत्वपूर्ण भागीदारी, कसोटीवर भारताचं वर्चस्व

19:26 (IST)22 Nov 2019
चेतेश्वर पुजारा - विराट कोहलीने भारताचा डाव सावरला

तिसऱ्या विकेटसाठी दोघांमध्ये महत्वपूर्ण भागीदारी, भारताने ओलांडला शतकी धावसंख्येचा टप्पा

अवश्य वाचा - IND vs BAN : विराटचा विक्रम, अनोखी कामगिरी करणारा पहिला भारतीय कर्णधार

18:08 (IST)22 Nov 2019
भारताला दुसरा धक्का, रोहित शर्मा माघारी

इबादतच्या गोलंदाजीवर रोहित पायचीत, पंच मारियस इरॅस्मस यांनी रोहितला बाद ठरवलं

रोहितकडून DRS घेण्याचा निर्णय, तिसऱ्या पंचांच्या पाहणी Upires Call आल्यामुळे रोहित बाद असल्यावर शिक्कामोर्तब

17:52 (IST)22 Nov 2019
दुसऱ्या सत्रापर्यंत भारताची संयमी फलंदाजी

एका गड्याच्या मोबदल्यात भारताची ३५ धावांपर्यंत मजल, रोहित-पुजाराची संयमी फलंदाजी

17:08 (IST)22 Nov 2019
भारताला पहिला धक्का, मयांक अग्रवाल माघारी

आक्रमक सुरुवातीनंतर अल-अमीन हुसेनच्या गोलंदाजीवर फटका खेळताना मयांक झेलबाद

भारताला पहिला धक्का

16:42 (IST)22 Nov 2019
बांगलादेशचा अखेरचा फलंदाजही माघारी, १०६ धावांत पाहुण्या संघाचा डाव आटोपला

मोहम्मद शमीने घेतला अखेरचा बळी, भारतीय जलदगती त्रिकुटाचा भेदक मारा

इशांत शर्माला पहिल्या डावात ५ बळी, उमेश यादवला ३ बळी तर मोहम्मद शमीला दोन बळी

16:31 (IST)22 Nov 2019
इशांत शर्माचा भेदक मारा सुरुच, बांगलादेशला नववा धक्का

नईम हसन त्रिफळाचीत, मात्र बांगलादेशने ओलांडला शंभर धावसंख्येचा टप्पा

16:20 (IST)22 Nov 2019
बांगलादेशला आठवा धक्का, मेहदी हसन बाद

इशांत शर्माच्या गोलंदाजीवर फटका खेळण्याच्या प्रयत्नात पुजाराने टिपला मेहदी हसनचा झेल

शंभर धावांच्यात आतच बांगलादेशचा आठवा गडी माघारी परतला

15:59 (IST)22 Nov 2019
पहिल्या सत्रानंतरही बांगलादेशची खराब सुरुवात, सातवा गडी माघारी

इशांत शर्माचा चेंडू खेळताना इबादत त्रिफळाचीत होऊन माघारी

15:29 (IST)22 Nov 2019
पहिल्या सत्रावर भारताचं वर्चस्व

६ गड्यांच्या मोबदल्यात बांगलादेशची ७३ धावांपर्यंत मजल

14:46 (IST)22 Nov 2019
बांगलादेशला सहावा धक्का, मेहमद्दुला बाद

इशांत शर्माच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक वृद्धीमान साहाने घेतला झेल, बांगलादेशची घसरगुंडी

14:29 (IST)22 Nov 2019
अखेरीस बांगलादेशने ओलांडला ५० धावांचा टप्पा

लिटन दास आणि मेहमद्दुला जोडीची संयमी फलंदाजी

14:20 (IST)22 Nov 2019
बांगलादेशचा निम्मा संघ माघारी

सुरुवातीपासून खेळपट्टीवर तग धरुन बसलेला शादमान इस्लाम अखेरीस माघारी

उमेश यादवच्या गोलंदाजीवर चेंडू शादमानच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षक वृद्धीमान साहाच्या हातात, बांगलादेशला पाचवा धक्का

14:05 (IST)22 Nov 2019
बांगलादेशची खराब कामगिरी सुरुच, चौथा गडी माघारी

मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर खेळत असताना मुश्फिकुर रहीमच्या बॅटची कड घेऊन चेंडू स्टम्पवर

मोहम्मद शमीने घेतला बळी

13:56 (IST)22 Nov 2019
उमेश यादवचा बांगलादेशला तिसरा धक्का, भारताची धडाकेबाज सुरुवात

मोहम्मद मिथुन उमेश यादवच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत

13:55 (IST)22 Nov 2019
बांगलादेशला दुसरा धक्का, कर्णधार मोमिनुल हक बाद

उमेश यादवच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने स्लिपमध्ये घेतला हकचा सुरेख  झेल

१७ धावसंख्येवर बांगलादेशचा दुसरा गडी बाद

13:35 (IST)22 Nov 2019
बांगलादेशला पहिला धक्का, इमरुल कायस माघारी

इशांत शर्माच्या गोलंदाजीवर टप्पा पडून आत आलेला चेंडू कायसच्या पॅडवर आदळला. पंचांनी बाद ठरवल्यानंतरही कायसचा DRS घेण्याचा निर्णय

तिसऱ्या पंचांच्या पाहणीत कायस बाद असल्याचं स्पष्ट, बांगलादेशचा पहिला गडी माघारी

13:01 (IST)22 Nov 2019
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या
13:00 (IST)22 Nov 2019
भारतीय संघात कोणतेही बदल नाहीत
12:59 (IST)22 Nov 2019
बांगलादेशने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

ऐतिहासिक कसोटी सामन्यासाठी असा असेल बांगलादेशचा संघ