भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावरचा कसोटी सामना हा संस्मरणीय ठरणार आहे. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या बांगलादेश संघाला भारतीय गोलंदाजांनी १०६ धावांवर माघारी धाडलं. यानंतर भारतीय संघाने आपल्या डावाची सावध सुरुवात केली. कर्णधार विराट कोहलीने पहिल्या दिवसाच्या खेळात ३२ वी धाव काढत अनोखा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने ५ हजार धावा काढणारा विराट पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याने ८६ डावांमध्ये ही कामगिरी करत माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटींगचा विक्रम मोडला आहे. रिकी पाँटींगने ९७ डावांमध्ये याआधी अशी कामगिरी करुन दाखवली होती.

दरम्यान पहिल्या डावात भारताचे सलामीवीर फारशी चांगली कामगिरी करु शकले नाही. मयांक अग्रवाल आणि रोहित शर्मा हे फलंदाज अनुक्रमे १४ आणि २१ धावांवर माघारी परतले.

अवश्य वाचा – IND vs BAN : घरच्या मैदानावर साहाची विक्रमी कामगिरी, धोनीशी केली बरोबरी