England tour of india 2021: पाच फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. इंग्लडच्या संघाचं भारतामध्ये आगमन झालं आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर ४ कसोटी, ५ टी-२० आणि ३ वन-डे सामने खेळणार आहे. यातील दोन कसोटी सामने चेन्नईत, उर्वरित दोन सामने आणि टी-२० मालिका अहमदाबाद तर वन-डे मालिका पुण्यात रंगणार आहे. पाहूयात वेळापत्रक, कधी-कुठे पाहता येणार सामना…..

असं असेल इंग्लंडच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक –

पहिला कसोटी सामना – ५ ते ९ फेब्रुवारी – चेन्नई (भारतीय वेळेनुसार सकाळी ९:३० मिनिटांनी)

दुसरा कसोटी सामना – १३ ते १७ फेब्रुवारी – चेन्नई (भारतीय वेळेनुसार सकाळी ९:३० मिनिटांनी)

तिसरा कसोटी सामना – २४ ते २८ फेब्रुवारी – अहमदाबाद (दिवस-रात्र) भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सुरु होईल.

चौथा कसोटी सामना – ४ ते ८ मार्च – अहमदाबाद (भारतीय वेळेनुसार सकाळी ९:३० मिनिटांनी)

सर्व टी-२० सामने अहमदाबादच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहेत….

१२ मार्च – पहिला टी-२० सामना, भारतीय वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता

१४ मार्च – दुसरा टी-२० सामना, भारतीय वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता

१६ मार्च – तिसरा टी-२० सामना, भारतीय वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता

१८ मार्च – चौथा टी-२० सामना, भारतीय वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता

२० मार्च – पाचवा टी-२० सामना, भारतीय वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता

सर्व वन-डे सामने पुण्याच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहेत….

२३ मार्च – पहिला वन डे सामना, भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता

२६ मार्च – दुसरा वन डे सामना, भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता

२८ मार्च – तिसरा वन डे सामना, भारतीय वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता

कुठे पाहाल –

कसोटी सामन्याचं लाइव्ह प्रेक्षपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर होणार आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यातील मालिकेचं लाइव्ह प्रेक्षपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर दाखवलं जाणार आहे.

ऑनलाइन स्ट्रीमिंग
इंग्लंड आणि भारत यांच्यातील मालिकेचं ऑनलाइन स्ट्रीमिंग हॉटस्टार नेटवर्क पाहायला मिळणार आहे.

पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारत आणि इंग्लंड संघानं घोषणा केली आहे.. पाहूयात दोन्ही संघात कोणत्या खेळाडूंना संधी दिली आहे. 

भारतीय संघ –

रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे आणि के. एल. राहुल, ऋषभ पंत , वृद्धीमान साहा, हार्दिक पांड्या, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, आर. अश्विन, कुलदीप यादव,  जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर

इंग्लंडचा संघ – 

जो रुट (कर्णधार), रॉरी बर्न्स, डॉम सिब्ले, झॅक क्रॉवली, डॅन लॉरेन्स, ऑलिव्हर स्टोन, बेन स्टोक्स, जोस बटलर, मोईन अली, बेन फोक्स, ख्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, डॉम बेस आणि जॅक लीच