कर्णधार इयॉन मॉर्गन आणि जो रुट यांनी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने अखेरच्या वन-डे सामन्यात विजय मिळवून मालिका २-१ च्या फरकाने जिंकली आहे. भारताने दिलेलं २५७ धावांचं आव्हान इंग्लंडने ८ गडी राखून पूर्ण केलं. इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर जो रुट आणि इयॉन मॉर्गन यांनी भारतीय गोलंदाजीचा नेटाने सामना केला. भारताने कमी धावसंख्येचं आव्हान दिल्यामुळे दोन्ही फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी न करता भागीदारी रचण्याकडे भर दिला. या भागीदारीच्या जोरावर दोन्ही फलंदाजांनी भारताला सामन्यात बॅकफूटवर ढकललं. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी १८६ धावांची भागीदारी केली.

अवश्य वाचा – सलग दुसऱ्या सामन्यात जो रुटचं शतक, ८ गडी राखून इंग्लंड विजयी; भारताने मालिकाही गमावली

इंग्लंडची ही जमलेली जोडी फोडण्याचा भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रयत्न केला, मात्र त्याला यात यश लाभलं नाही. भारताच्या प्रत्येक गोलंदाजांना इंग्लंडचे फलंदाजांनी संयमाने खेळून काढलं. जो रुटने सामन्यात नाबाद १०० तर कर्णधार इयॉन मॉर्गनने नाबाद ८८ धावांची खेळी केली. भारताकडून शार्दुल ठाकूरला सामन्यात एकमेव बळी मिळाला.

अवश्य वाचा – विराट कोहलीचा आणखी एक विक्रम, धोनी – सौरव गांगुलीलाही टाकलं मागे

दरम्यान तिसऱ्या वन-डे सामन्यात तब्बल १० विक्रमांची नोंद करण्यात आली – 

० – जो रुट – इयॉन मॉर्गन या जोडीइतक्या धावा एकाही इंग्लंडच्या जोडीला जमलं नाहीये. रुट-मॉर्गन जोडीने अॅलिस्टर कूक – इयान बेल जोडीचा २ हजार ११८ धावांचा विक्रम मोडीत काढला.

१ – कर्णधार या नात्याने सर्वात जलद ३ हजार धावा करणारा विराट कोहली पहिला फलंदाज. कोहलीने महेंद्रसिंह धोनी, सौरव गांगुलीला टाकलं मागे.

१ – भारतीय संघाचा वन-डे मालिकेत २-१ ने झालेला पराभव हा कोहलीचा कर्णधार म्हणून (उभय संघातील सामन्यांमध्ये) पहिलाच पराभव ठरलाय.

२ – तिसऱ्या वन-डे सामन्यात भारताने संपूर्ण डावात केवळ २ षटकार लगावले. हे दोन्ही षटकार शार्दुल ठाकूरने लगावले आहेत.

४ – धोनी, अझरुद्दीन आणि सौरव गांगुलीनंतर कर्णधार या नात्याने ३ हजार धावांचा टप्पा ओलांडणारा विराट चौथा खेळाडू ठरलाय.

५ – वन-डे क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडच्या नावावर तिसऱ्या विकेटसाठी ५ सर्वोत्तम भागीदाऱ्या नोंदवल्या गेल्या आहेत.

८ – सलग ८ मालिका विजयांनंतर कर्णधार कोहलीची विजयाची शृखंला अखेर तुटली.

१३ – जो रुटचं वन-डे कारकिर्दीतलं हे १३ वं शतक ठरलं. जजो रुटने इंग्लंडच्या मार्कस टेस्कॉथिकचा वन-डे क्रिकेटमधला सर्वाधिक शतकांचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

१९ – वन-डे क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने ३ हजार धावांचा टप्पा ओलांडणारा कोहली जगातला १९ वा कर्णधार ठरला आहे.

१९९७ – भारताने १९९७ साली पाकिस्तानविरुद्ध शेवटची ३ वन-डे सामन्यांची मालिका गमावली होती.

अवश्य वाचा – Video: टप्पा पडून आदिल रशिदचा चेंडू थेट यष्ट्यांवर, विराट कोहलीही अवाक