News Flash

बुमराहच्या जाळ्यात अडकला न्यूझीलंडचा कर्णधार, झहीरच्या कामगिरीची पुनरावृत्ती

कसोटी मालिकेत टीम इंडियाला व्हाईटवॉश

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आपल्या न्यूझीलंड दौऱ्याचा शेवटही पराभवाने करावा लागला. ख्राईस्टचर्च कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारतावर ७ गडी राखत मात करत मालिकेत २-० अशी बाजी मारली. वन-डे मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही भारताला व्हाईटवॉश स्विकारावा लागला.

न्यूझीलंडने या मालिकेत बाजी मारली असली, तरीही त्यांचा कर्णधार केन विल्यमसन या सामन्यात अपयशी ठरला. दोन्ही डावांत जसप्रीत बुमराहने विल्यमसनला आपल्या जाळ्यात अडकवलं. पहिल्या डावात विल्यमसन ३ तर दुसऱ्या डावात अवघ्या ५ धावा करु शकला. एका कसोटी सामन्यात दोन्ही डावात विल्यमसनला बाद करणारा बुमराह दुसरा भारतीय गोलंदाज ठरलाय.

अवश्य वाचा –  Ind vs NZ : ‘त्या’ भन्नाट कॅचवर रविंद्र जाडेजाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

याआधी २०१४ साली ऑकलंड कसोटी सामन्यात झहीर खानने विल्यमसनला पहिल्या डावात ११३ तर दुसऱ्या डावात ३ धावांवर बाद केलं होतं. जसप्रीत बुमराहने या सामन्यात ५ बळी घेतले. दरम्यान, न्यूझीलंड दौऱ्यानंतर टीम इंडिया घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2020 10:56 am

Web Title: ind vs nz 2nd test jasprit bumrah equals with zaheer khan performance psd 91
Next Stories
1 “आधी त्या आळशी रवी शास्त्रींना हाकला”
2 माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूने सांगितलं टीम इंडियाच्या पराभवाचं कारण, बघा तुम्हाला पटतंय का??
3 विराटने सांगितलं पराभवामागचं खरं कारण, म्हणाला…
Just Now!
X