13 July 2020

News Flash

Ind vs NZ : सलग तिसऱ्या सामन्यात विराट अपयशी

९ धावांवर विराट कोहली माघारी

न्यूझीलंडविरुद्ध वन-डे सामन्यांच्या मालिकेत कर्णधार विराट कोहलीच्या मागे ग्रहण लागलेलं आहे. पहिल्या दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर, तिसऱ्या वन-डे सामन्यातही भारतीय फलंदाजांची अडखळती सुरुवात झाली. महत्वाची गोष्ट म्हणजे कर्णधार विराट कोहलही अखेरच्या सामन्यात अपयशी ठरला. ९ धावांवर हमिश बेनेटने विराटला माघारी धाडलं.

यामुळे ३ वन-डे सामन्यांच्या मालिकेत एकही शतक न झळकावण्याची विराटची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

दरम्यान विराट कोहली माघारी परतल्यानंतर श्रेयस अय्यरने सर्वात आधी पृथ्वी शॉ आणि त्यानंतर लोकेश राहुलच्या साथीने भागीदारी करत संघाचा डाव सावरला. यादरम्यान लोकेशने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2020 9:36 am

Web Title: ind vs nz 3rd odi for 1st time virat kohli not scored century in 3 consecutive bilateral odi psd 91
Next Stories
1 U-19 विश्वचषकातला राडा; ICC कडून बांगलादेशी खेळाडूंसह भारतीय खेळाडूंवरही कारवाई
2 U-19 World Cup : बांगलादेशच्या विजयात माजी मुंबईकर खेळाडूची महत्वाची भूमिका
3 बहिणीच्या निधनाचं दु:ख विसरुन तो वाघासारखा लढला, वाचा विश्वचषक विजेत्या अकबर अलीची कहाणी
Just Now!
X