श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुलने तिसऱ्या वन-डे सामन्यात केलेल्या संयमी खेळाच्या जोरावर भारताने द्विशतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडला. श्रेयस अय्यरने या सामन्यात पृथ्वी शॉ आणि लोकेश राहुलसोबत महत्वपूर्ण भागीदारी रचली. ६३ चेंडूत अय्यरने ९ चौकारांसह ६२ धावा केल्या. टीम इंडियात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत असताना अय्यरची गेल्या काही सामन्यांमधली कामगिरी ही वाखणण्याजोगी राहिलेली आहे.

अवश्य वाचा – Ind vs NZ : श्रेयस अय्यर चमकला, धोनीच्या विक्रमाशी बरोबरी

३ वन-डे सामन्यांच्या मालिकेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत असताना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत श्रेयस अय्यरने पहिलं स्थान पटकावलं आहे. यादरम्यान त्याने युवराज सिंह आणि राहुल द्रविडचा विक्रम मोडला.

याचसोबत वन-डे क्रिकेटमध्ये १६ डावांनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीतही श्रेयस अय्यरने पहिलं स्थान मिळवलं आहे.

श्रेयस मोठी खेळी उभी करणार असं वाटत असतानाच जिमी निशमच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन माघारी परतला.