पहिल्या टी २० सामन्यात न्यूझीलंडने भारताला ८० धावांनी पराभूत केले. यजमानांनी केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे भारताला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने दिलेले २२० धावांचे आव्हान पार करताना भारताचा डाव कोलमडला. भारतीय संघ केवळ १३९ धावांपर्यंत मजल मारु शकला. या बरोरबच हा भारताचा आव्हानाचा पाठलाग करताना सर्वात वाईट टी २० पराभव ठरला.

२२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या या सारख्या फलंदाजांनी पूर्णपणे गुडघे टेकले. शिखर धवन, विजय शंकर, महेंद्रसिंह धोनी यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. धोनीने ३१ चेंडूत ३९ धावा केल्या. भारताकडून धोनीच्या धावा सर्वाधिक ठरल्या. पण तरीदेखील धोनीच्या नावे एक नकोसा विक्रम झाला. आजपर्यंत टी २० सामन्यात पाच वेळा धोनीने भारताकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्या पाचही सामन्यात भारताला हार पत्करावी लागली आहे.

धोनी ४८ नाबाद वि. ऑस्ट्रेलिया, सिडनी २०१२ (भारताचा ३१ धावांनी पराभव)

धोनी ३८ वि. इंग्लंड, मुंबई २०१२ (भारताचा ६ गडी राखून पराभव)

धोनी ३० वि. न्यूझीलंड, नागपूर २०१६ (भारताचा ४७ धावांनी पराभव)

धोनी ३६ नाबाद वि. इंग्लंड, कानपूर २०१७ (भारताचा ७ गडी राखून पराभव)

धोनी ३९ वि. न्यूझीलंड, वेलिंगटन २०१९ (भारताचा ८० धावांनी पराभव)

दरम्यान, या पराभवामुळे न्यूझीलंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने सर्वाधिक ३ बळी टिपले.