28 February 2021

News Flash

IND vs NZ : न्यूझीलंड संघाची घोषणा, ९ महिन्यानंतर या खेळाडूचे पुनरागमन

२३ जानेवारीपासून सुरू होणार मालिका

New Zealand's captain Tim Southee, center, is congratulated on taking a wicket of Sri Lanka's Kusal Mendis during their twenty/20 cricket international at Eden Park in Auckland, New Zealand, Friday, Jan. 11, 2019. (AP Photo/David Rowland)

२३ जानेवारीपासून भारताविरोधात सुरू होणाऱ्या मालिकेतील पहिल्या ३ वन-डेसाठी यजमान न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून न्यूझीलंडचा संघ तुफान फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडने नुकताच पाकिस्तान आणि श्रीलंका संघाचा पराभव केला आहे. विजयी न्यूझीलंड संघात भारताविरोधात दोन बदल करण्यात आले आहेत.

डावखुरा फिरकी गोलंदाज मिचेल सॅण्टनरला संघामध्ये परत बोलावलं आहे. सॅण्टनर तळाला चांगली फलंदाजीही करू शकतो. तब्बल १० महिन्यानंतर सॅण्टनरचे संघात पुनरागमन झाले आहे.  मिचेल सॅण्टनरशिवाय टॉम लेथम आणि कॉलीन डि ग्रॅण्डहोम यांचेही पुनरागमन झालं आहे. न्यूझीलंड आणि भारत यांच्यामध्ये ५ वनडे आणि ३ टी-२० सामन्याची मालिका होणार आहे.

असा आहे न्यूझीलंडचा संघ –

केन विलियमसन (कर्णधार), ट्रेण्ट बोल्ट, डग ब्रेसवेल, रॉस टेलर, कॉलीन डि ग्रॅण्डहोम, लॉकी फरग्यूसन, मार्टीन गप्टील, मॅट हेन्री, टॉम लेथम, कॉलीन मुन्रो, हेनरी निकोल्स, मिचेल सॅण्टनर, ईश सोदी, टीम साऊदी

भारताचा संघ – 

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, शुभमन गिल, एमएस धोनी, विजय शंकर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, मोहम्मद शमी

भारताचा न्यूझीलंड दौरा (5 वन-डे आणि 3 टी-20) –

  • 23 जानेवारी (पहिला वन-डे सामना, नेपियर)
  • 26 जानेवारी (दुसरा वन-डे सामना, बे ओव्हल)
  • 28 जानेवारी (तिसरा वन-डे सामना, बे ओव्हल)
  • 31 जानेवारी (चौथा वन-डे सामना, हॅमिल्टन)
  • 3 फेब्रुवारी (पाचवा वन-डे सामना, वेलिंग्टन)
  • 6 फेब्रुवारी (पहिला टी-20 सामना, वेलिंग्टन)
  • 8 फेब्रुवारी (दुसरा टी-20 सामना, ऑकलंड)
  • 10 फेब्रुवारी (तिसरा टी-20 सामना, हॅमिल्टन)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2019 8:26 pm

Web Title: ind vs nz new zealand name squad for first three odis against india
Next Stories
1 10YearChallenge : धोनीच्या षटकाराला आयसीसीचा सलाम
2 वयाच्या चाळीशीत वासिम जाफरचा नवा विक्रम, आशियामधला ठरला पहिला फलंदाज
3 माणसांकडून चुका होतातच, राहुल-पांड्याची गांगुलीकडून पाठराखण
Just Now!
X