टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अखेरीस भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेच बाजी मारली आहे. मोहालीच्या मैदानावर विराटने रोहित शर्माला मागे टाकत सर्वाधिक धावा पटकावणारा फलंदाज असा बहुमान मिळवला होता. रविवारी बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर रोहितला हा विक्रम पुन्हा आपल्या नावे करण्यासाठी ८ धावांची गरज होती. रोहितने ९ धावा काढत हा विक्रम आपल्या नावे जमाही केला. मात्र ९ धावा काढून रोहित हेंड्रिग्जच्या गोलंदाजीवर माघारी परतला.

यानंतर खेळपट्टीवर आलेल्या विराट कोहलीनेही स्थिरावण्यासाठी काही वेळ घेतला. विराट कोहलीने १५ चेंडूत ९ धावा काढत रबाडाच्या गोलंदाजीवर सीमारेषेवर उभ्या असलेल्या फेलुक्वायोकडे झेल दिला. यादरम्यान विराटने रोहितला पुन्हा एकदा मागे टाकत टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज बनण्याचा बहुमान पटकावला.

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारे फलंदाज –

१) विराट कोहली – २४५० धावा

२) रोहित शर्मा – २४४३ धावा

३) मार्टीन गप्टील – २२८३ धावा

४) शोएब मलिक – २२६३ धावा

५) ब्रँडन मॅक्युलम – २१४० धावा