27 May 2020

News Flash

IND vs SA : शतक मयांकचं अन् विक्रम टीम इंडियाचा!

मयांकने केली १०८ धावांची खेळी

भारतीय संघाचा सलामीवीर मयांक अग्रवाल याने सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केली. नाणेफेक जिंकून विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या कसोटीत दोन शतकं झळकावणारा रोहित शर्मा पुणे कसोटीत स्वस्तात माघारी परतला. पण मयांक अग्रवालने चेतेश्वर पुजाराच्या साथीने शतकी भागीदारी रचत भारताचा डाव सावरला. मयांक अग्रवालने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सलग शतक झळकावले.

मयांकने दमदार कामगिरी करत भारतीय संघाला एका जुन्या विक्रमाशी बरोबरी करून दिली. मयांकचे शतक हे भारतीय संघाकडून या मालिकेतील चौथे शतक ठरले. पहिल्या कसोटी सामन्यात मयांकने १ तर रोहितने २ शतके ठोकली होती. या सामन्यात मयांकने आणखी एक शतक लगावले. त्याचसोबत एका मालिकेत चार शतके ठोकण्याची ही टीम इंडियाची चौथी वेळ ठरली. या आधी माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी दोन वेळा मालिकेत ४ शतके ठोकली होती, तर २००९-१० मध्ये सेहवागने २ आणि गंभीरने २ शतके ठोकली होती. त्यानंतर सध्या सुरू असलेल्या सामन्यात मयांक आणि रोहितने मिळून ४ शतके लगावली.

त्याचसोबत महत्वाची बाब म्हणजे भारतीय संघाला या मालिकेत एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे. या आधी एका कसोटी मालिकेत भारताने ४ पेक्षा अधिक शतके लगावलेली नाहीत. या मालिकेत भारताकडून आणखी एका फलंदाजाने शतक ठोकल्यास तो विक्रम ठरू शकेल.

याशिवाय, सलग दोन शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही मयांकने स्थान मिळवले आहे. २००९/१० साली विरेंद्र सेहवागने सलग दोन शतके झळकावली होती. मयांक अग्रवालने यंदाच्या हंगामात ही कामगिरी करुन दाखवली. मयांक अग्रवालने १९५ चेंडूंमध्ये १६ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने १०८ धावा केल्या. अखेरीस कगिसो रबाडाने कर्णधार फाफ डु-प्लेसिसकरवी झेलबाद करत भारताला धक्का दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2019 5:40 pm

Web Title: ind vs sa mayank agarwal century team india record most centuries by indian team in one test series vjb 91
Next Stories
1 ‘टीम इंडिया’चा फलंदाज बांधणार अभिनेत्रीशी लग्नगाठ
2 Ind vs SA : सलग दुसऱ्या कसोटीत मयांक अग्रवालचं शतक, विरेंद्र सेहवागशी बरोबरी
3 कुलदीप संघाबाहेर का, हे त्यालाही माहिती आहे – विराट
Just Now!
X