26 September 2020

News Flash

IND vs WI : …आणि केवळ १० धावांनी रोहितचा अनोखा विक्रम हुकला

६३ धावा काढून रोहित शर्मा माघारी

विंडीजविरुद्ध कटकच्या मैदानावर तिसऱ्या वन-डे सामन्यात भारतीय सलामीवीरांनी धडाक्यात सुरुवात केली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी विंडीजने विजयासाठी दिलेल्या ३१६ धावांचा पाठलाग करताना पहिल्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी केली. रोहितने यादरम्यान अनेक विक्रमही आपल्या नावे जमा केले.

अवश्य वाचा –  IND vs WI : रोहित शर्माने मोडला सनथ जयसूर्याचा विक्रम, तो ही अवघ्या ९ धावांत

एका कॅलेंडर वर्षात सलामीवीर या नात्याने सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम रोहितने मोडला आहे. लंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याने १९९७ साली सलामीवीर या नात्याने २३८७ धावा काढल्या होत्या, आता हा विक्रम रोहितच्या नावे जमा झाला आहे. याचसोबत २०१९ वर्षात सर्वाधिक वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा फलंदाज म्हणूनही रोहितने आपलं अव्वल स्थान कायम राखलं. सलामीवीर या नात्याने रोहित शर्माची एका कॅलेंडर वर्षातलं हे २० वं अर्धशतक ठरलं. (तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये) या निकषामध्ये रोहितने भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक गॅरी कस्टर्न यांचा विक्रम मोडला.

अवश्य वाचा – IND vs WI : रोहित शर्माचा डबल धमाका, कर्णधार विराटसह माजी प्रशिक्षकांनाही टाकलं मागे

मात्र केवळ १० धावांनी रोहितचं दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत येण्याचं स्वप्न अखेर संपुष्टात आलं आहे. रोहितने ६३ चेंडूत ६३ धावा केल्या. त्याच्या या खेळीत रोहितने ८ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. मात्र एका कॅलेंडर वर्षात वन-डे क्रिकेटमध्ये दीड हजार धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितला स्थान मिळवता आलं नाही.

वर्षाअखेरीस रोहितच्या खात्यात वन-डे क्रिकेटमध्ये १४९० धावा जमा आहेत. केवळ १० धावांनी त्याचं दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळवण्याचं स्वप्न भंगलं आहे. जेसन होल्डरने रोहितला यष्टीरक्षक होपकरवी झेलबाद केलं.

अवश्य वाचा – IND vs WI : मोहम्मद शमीची ऐतिहासिक कामगिरी, दुसऱ्यांदा पटकावलं मानाचं स्थान

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2019 8:44 pm

Web Title: ind vs wi 3rd odi rohit sharma misses unique record by 10 runs know here psd 91
Next Stories
1 IND vs WI : रोहित शर्माचा डबल धमाका, कर्णधार विराटसह माजी प्रशिक्षकांनाही टाकलं मागे
2 IND vs WI : मोहम्मद शमीची ऐतिहासिक कामगिरी, दुसऱ्यांदा पटकावलं मानाचं स्थान
3 IND vs WI : रोहित शर्माने मोडला सनथ जयसूर्याचा विक्रम, तो ही अवघ्या ९ धावांत
Just Now!
X