News Flash

IND vs WI : घरच्या मैदानावर ‘हिटमॅन’ची फटकेबाजी, शाहिद आफ्रिदीला टाकलं मागे

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओलांडला ४०० षटकारांचा टप्पा

रोहित शर्माने विंडीजविरुद्ध पहिल्या दोन सामन्यांमधली खराब कामगिरीला मागे टाकत दमदार पुनरागमन केलं आहे. वानखेडे मैदानावरील अखेरच्या टी-२० सामन्यात रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० षटकारांचा टप्पा ओलांडला. या विक्रमी कामगिरीदरम्यान रोहितने ख्रिस गेल आणि शाहिद आफ्रिदी या दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. ख्रिस गेलच्या नावावर सध्या ५३४ तर शाहिद आफ्रिदीच्या नावावर ४७६ षटकार जमा आहेत.

मात्र सर्वात कमी डावांमध्ये ४०० षटकारांचा टप्पा गाठणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्माने शाहिद आफ्रिदीला मागे टाकलं आहे. रोहितने आपल्या ३६० व्या डावात ही कामगिरी केली आहे, तर शाहिद आफ्रिदीला या कामगिरीसाठी ४३७ डाव लागले होते.

लोकेश राहुल आणि रोहित शर्मा या जोडीने विंडीजच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत ८ षटकांच्या आतच भारताला १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 7:49 pm

Web Title: ind vs wi 3rd t20i rohit sharma slams west indies bowlers gets pass shahid afridi in elite list psd 91
टॅग : Ind Vs WI,Rohit Sharma
Next Stories
1 IND vs WI : रोहित शर्मा @ 400, अनोखी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज
2 Ranji Trophy : द्विशतकी खेळीत पृथ्वी शॉचा विक्रम, सचिन-रोहित शर्माला टाकलं मागे
3 गोलंदाज, फलंदाज नव्हे; तर अंपायर करणार विक्रम
Just Now!
X