भारत आणि विंडीज यांच्यात एकदिवसीय मालिका सुरु असून या मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना त्रिवेंद्रम येथे खेळला जात आहे. या मालिकेत भारत सध्या २-१ने आघाडीवर आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात विजय मिळवून ३-१ ने मालिका जिंकण्याच्या इराद्याने भारत मैदानात उतरला आहे तर मालिका बरोबरीत सोडवण्याचा उद्देश मनात ठेवून विंडीजचे खेळाडू सर्वस्व पणाला लावून खेळ करत आहेत. या सामन्याचा निकाल काहीही लागला, तरी सामन्याआधी नशिब विराटवर रुसल्यामुळे विराटला एका विक्रमाला मुकावे लागले.

या एकदिवसीय मालिकेत प्रथमच विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर याने नाणेफेक जिंकली आणि फलंदाजीचा निर्णय घेतला. या आधी प्रत्येक सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली यानेच नाणेफेक जिंकली होती. शेवटच्या एकदिवसीय सामन्यात जर विराट कोहलीने नाणेफेक जिंकली असती, तर भारतात दोन देशांमध्ये ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत सर्व सामन्यात नाणेफेक जिंकणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला असता. पण तसे न झाल्यामुळे विराट या विक्रमाला मुकला.

या आधी इंग्लंड दौऱ्यात पाचही कसोटी सामन्यात नाणेफेक ठरल्याचा दुर्दैवी विक्रम विराटच्या नावे झाला होता. असा विक्रम करणारा तो तिसरा भारतीय कर्णधार ठरला होता. या आधी लाला अमरनाथ आणि कपिल देव यांच्यावर ५ सामन्याच्या कसोटी मालिकेत नाणेफेकीत पराभूत होण्याची नामुष्की ओढवली मालिकेत विराटला एक सकारात्मक विक्रम करण्याची संधी होती.