News Flash

भारतीय संघाचे ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांबरोबर चहापान

नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अ‍ॅबॉट यांची भेट दिली, या वेळी चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

| January 2, 2015 02:27 am

नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अ‍ॅबॉट यांची भेट दिली, या वेळी चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संघाबरोबरच ऑस्ट्रेलियाच्या संघानेही या वेळी एकत्रितपणे पंतप्रधानांबरोबर छायाचित्र काढले.
‘‘भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अ‍ॅबॉट यांची नूतन वर्षांच्या पहिल्या दिवशीच संध्याकाळी भेट घेतली. या वेळी पंतप्रधानांनी भारतीय संघासाठी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या पत्रकात म्हटले आहे.
अ‍ॅबॉट यांनी भारताचा नवनिर्वाचित कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथ यांच्यासह खास छायाचित्र काढले. या वेळी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या उपस्थितीतबाबत संभ्रम आहे. कारण कोणत्याही छायाचित्रांमध्ये धोनी नव्हता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चौथा कसोटी सामना ६ जानेवारीपासून सुरू होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 2:27 am

Web Title: india in australia virat kohli in focus at prime ministers tea party
टॅग : Virat Kohli
Next Stories
1 रहाणे, अश्विन उपकर्णधारपदाच्या शर्यतीत
2 धोनी हा आदर्श क्रिकेटपटू – हॅडीन
3 मुंबईत रंगणार तिरंदाजीचा मेळा
Just Now!
X