आयपीएलमध्ये तुफान फटकेबाजी करणाऱ्या के.एल राहुलनं पहिल्याच टी-२० सामन्यात दमदार अर्धशतकी खेळी केली आहे. या अर्धशतकी खेळीनंतर राहुलनं विराट कोहली, रोहित शर्मा आणि धोनीच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. के. एल. राहुलनं ४५ टी-२० सामन्यातील ३९ व्या डावात १५०० धावा केल्या आहेत. १५०० धावा करणाऱ्या खेळाडूंच्या पंगतीत राहुलला स्थान मिळालं आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघासाठी राहुलनं एका बाजूनं किल्ला लढवला. मात्र, दुसऱ्या बाजूनं एकाही फलंदाजानं त्याला साथ दिली नाही.  शिखर धवन, विराट, संजू सॅमसन आणि मनिष पांडे स्वस्तात बाद झाले. के. राहुलनं मात्र संयमी फलंदाजी करत अर्धशतकी खेळी केली. राहुलनं ४० चेंडूत ५१ धावांची खेळी केली.

आणखी वाचा- परफेक्ट यॉर्कर! स्टार्कने उडवला शिखर धवनचा त्रिफळा; पाहा व्हिडीओ

टी-२० मध्ये १५०० पेक्षा जास्त करणारे भातीय फलंदाज –

विराट कोहली – 2803

रोहित शर्मा – 2773

एम. एस. धोनी – 1617

सुरेश रैना – 1605

शिखर धवन – 1589

के. एल राहुल – 1511

याशिवाय ३९ डावांत १५०० धावा करणाऱ्या विराट कोहलीशीही राहुलनं बरोबरी केली आहे. विराट कोहली, राहुल, बाबर आजम आणि अॅरोन फिंच यांनी ३९ डावांत १५०० धावांचा टप्पा पार केला होता.