News Flash

कॅप्टन कोहली २ हजारी मनसबदार, टी-२० क्रिकेटमध्ये अनोख्या विक्रमाची नोंद

सर्वात जलद २ हजार धावा करणारा विराट पहिला खेळाडू

विराट कोहली (संग्रहीत छायाचित्र)

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये, इंग्लंडविरुद्ध सामन्यात आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद २ हजार धावा करण्याचा विक्रम कोहलीने आपल्या नावे केला आहे. आयर्लंडविरुद्ध २ टी-२० सामन्यांच्या मालिकेत विराटला हा अनोखा विक्रम आपल्या नावे करण्याची संधी चालून आली होती. मात्र दोन्ही सामन्यात विराट फारशी चमकदार कामगिरी करु शकला नाही.

अवश्य वाचा – भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० सामन्यात ७ विक्रमांची नोंद, धोनी-कोहलीच्या नावावर ‘हा’ विक्रम

मात्र इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात विराटने मिळालेल्या संधीचं पूर्णपणे सोनं केलं. २ हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी आवश्यक असलेल्या ८ धावा विराटने सहज काढत इतिहासात आपली नोंद केली. सध्या टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत कोहली चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचे मार्टीन गप्टील, ब्रँडन मॅक्युलम आणि पाकिस्तानचा शोएब मलिक हे सध्या विराटच्या पुढे आहेत. याआधी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद २ हजार धावा करण्याचा विक्रम हा मॅक्युलमच्या नावावर जमा होता, मॅक्युलमने ६६ डावांमध्ये ही कामगिरी साधली होती. मात्र विराटने केवळ ५६ डावांमध्ये हा पल्ला गाठला.

अवश्य वाचा – भारताच्या विजयात कुलदीप-लोकेश राहुल चमकले, मालिकेत १-० ने आघाडी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 7:27 am

Web Title: india tour of england 2018 virat kohli breaks another record becomes fastest to 2000 t20i runs
टॅग : Virat Kohli
Next Stories
1 आशियाई खेळांसाठी ५२४ खेळाडूंच्या पथकाला ऑलिम्पिक संघटनेची मान्यता
2 मुंबई रणजी प्रशिक्षकपदासाठी रमेश पोवारचा अर्ज
3 Wimbeldon 2018: सामना पहायला आलेल्या ‘त्या’ मुलीची अजब मागणी रॉजर फेडररने केली पूर्ण