ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयान चॅपल हे सध्या भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराच्या खेळीने चांगलेच प्रेमात पडले आहेत. अॅडलेड कसोटीत पहिल्या डावात शतक तर दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी करत पुजाराने भारताचं पारडं जड ठेवण्यात महत्वाचा वाटा उचलला. ESPNCricinfo या संकेतस्थळासाठी लिहीलेल्या विशेष लेखात चॅपल यांनी द्रविडची तुलना भारताचा दुसरा राहुल द्रविड अशी केली आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : पुजाराला बाद करण्यात लॉयनसोबत शेन वॉर्नचाही हात, जाणून घ्या कसं?

“कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी योग्य उमेदवार शोधताना साधारपणे दोन पर्यायांचा विचार केला जातो. पहिलं पर्याय हा आक्रमक फलंदाजाचा असतो. आपल्यातले आक्रमक फटके चेंडू नवा असताना तितक्याच तंत्रशुद्धपद्धतीने खेळण्याचं कसब असलेला खेळाडू तिसऱ्या क्रमांच्या जागेवर यशस्वी होतो. रिकी पाँटींगने आपल्या काळात ऑस्ट्रेलियासाठी ही कामगिरी केली होती. जर असा खेळाडू तुमच्या संघात नसेल तर तुम्ही संयमी फलंदाजाची निवड करता. परिस्थितीनुरुप फलंदाजी करत खेळपट्टीवर तळ ठोकून राहणं, आणि इतर फलंदाजांना धावा काढण्याच्या योग्य संधी निर्माण करुन देताना आपली खेळी मोठी करणं अशा शैलीचेही फलंदाज तिसऱ्या जागेवर यशस्वी होतात. भारतासाठी राहुल द्रविडने गेली अनेक वर्ष हे काम केलंय. चेतेश्वर तंतोतंत राहुल द्रविडसारखी फलंदाजी करत नसला तरीही त्याने त्याच्या फलंदाजीतले आणि तिसऱ्या जागेवरील जबाबदारीचे काही गुण योग्य हेरले आहे. एका अर्थाने पुजारा हा भारतीय संघाचा दुसरा द्रविडच आहे.” चॅपल यांनी पुजाराच्या खेळीचं कौतुक केलं.

अॅडलेडच्या खेळपट्टीवर संयमाने फलंदाजी केली तर चांगलं फळं मिळतं हे पुजाराने दोन्ही डावातील आपल्या खेळीतून दाखवून दिलं आहे. याच संयमी फलंदाजीच्या जोरावर त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा सामना केला. त्याच्यातला हा गुण त्याच्या इतर सहकाऱ्यांनी घेण्यास काहीच हरकत नाहीये. जर पहिल्या डावात पुजाराने संयम दाखवून खेळपट्टीवर तग धरला नसता, तर भारतीय संघ कदाचीत पराभूत झाला असता. चॅपल पुजाराने केलेल्या खेळीचं कौतुक करताना बोलत होते.

अवश्य वाचा – नायजेल भाऊ, स्टिव्ह बकनरशी स्पर्धा करताय का?