पहिल्या कसोटी सामन्यात गोलंदाजी करताना शमीच्या पायात फाटके शूज दिसून आले. सोशल मीडियावर शमीच्या या शूजची चर्चा सुरु आहे. शमीनं फाटलेल्या शूज का घेतला याबाबत चर्चा सुरु आहे. शमीने फाटलेला शूज का घातला असू शकतो, याबाबत समालोचन करताना शेन वॉर्न यानं सांगितलं आहे.

भारतीय संघानं दिलेल्या २४४ धावांचा ऑस्ट्रेलियाचा संघ पाठलाग करत होता. भारतीय संघातील वेगवान गोलंदाज शमीच्या पायाकडे असचानक कॅमेरा गेला. त्यावेळी शमीचा शूज फाटलेला दिसला. यावर समालोचन करणारे अॅडम गिलख्रिस्ट, मार्क वॉ आणि शेन वार्न यांनी चर्चा केली. यावेळी शेन वॉर्न यानं शमीने फाटलेला शूज का घातला असू शकतो, याबाबत हे सांगितलं.

वॉर्न म्हणाला की, ‘गोलंदाजीच्या हाय आर्म शैलीमुळे गोलंदाजी करताना डावा पाय जमिनीवर टेकल्यानंतर अंगठ्यावर दबाव येऊ नये, म्हणून शमीने आपल्या बुटाला छिद्र पाडले आहे. ‘

 

भारताकडे पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी

रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने अॅडलेड कसोटीत पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेतली आहे. २४४ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९१ धावांवर आटोपला. कर्णधार टीम पेनचं अर्धशतक आणि मार्नस लाबुशेनची एकाकी झुंज या जोरावर ऑस्ट्रेलियाने स्वतःवरची नामुष्की टाळली. भारताकडून पहिल्या डावात रविचंद्रन आश्विनने ४, उमेश यादवने ३ जसप्रीत बुमराहने २ बळी घेतले.