News Flash

सर जाडेजानं रचला इतिहास; धोनी-कोहलीच्या खास पंगतीत मिळालं स्थान

जाडेजाची अष्टपैलू खेळाडू

मेलबर्न येथेली बॉक्सिंग डे कसोटीत भारताच्या विजयात रविंद्र जाडेजाची भूमिका महत्वाची होती. पहिल्या डावांत फलंदाजी करताना जाडेजानं ५७ धावाची महत्वपूर्ण खेळी केली होती. तर गोलंदाजीत एक बळी मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना जाडेजानं दोन बळी मिळवले होते. पहिल्या डावांत संघ अडचणीत असताना कर्णधार रहाणेसोबत १२१ धावांची महत्वपूर्ण भागिदारी केली. त्यामुळेच भारतीय संघाला मोठी आघाडी घेण्यात यश मिळालं. मेलबर्न येथे झालेला कसोटी सामना रविंद्र जाडेजाचा ५० वा कसोटी सामना होता. जाडेजानं ५० कसोटी सामने खेळतानाच एम. एस. धोनी आणि विराट कोहलीच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे.

एकदिवसीय सामने, टी-२० आणि कसोटी या तिन्ही प्रकारात ५० किंवा त्यापैक्षा जास्त सामने खेळणारा रविंद्र जाडेजा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. जाडेजानं ट्विट करत आनंदही व्यक्त केला आहे. ट्विटमध्ये जाडेजा म्हणाला की, “माही भाई आणि विराटच्या पंगतीत स्थान मिळ्याचा आनंद आहे. माझ्यासाठी हा एक मोठा सन्मान आहे. बीसीसीआय, संघ सहकारी आणि सपोर्ट स्टाप यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी धन्यवाद… आशाही यापुढेही असेच सुरु राहिल. जय हिंद.”


२००९ मध्ये रविंद्र जाडेजानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानं आतापर्यंत ५० कसोटी, ५० टी-२० आणि १६८ एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. कसोटीत २१६, एकदिवसीय सामन्यात १८८ आणि टी-२० मध्ये ३९ विकेट जाडेजाच्या नावावर आहेत. तर कसोटीत १९२६ धावा, एकदिवसीय सामन्यात २४११ आणि टी-२० मध्ये २१७ धावा जाडेजाच्या नावावर आहेत.

आणखी वाचा : 

धोनी दांपत्याने Mr and Mrs चहलसाठी होस्ट केली खास डिनर पार्टी; पाहा खास फोटो 

विजयी शॉट अन् राहणेनं केली राहुल द्रविडची बरोबरी

वर्षाचा शेवट गोड, ‘त्या’ पराभवाचा घेतला बदला

३१ वर्षांनंतर भारतीय गोलंदाजांसमोर कांगारुंनी नांगी टाकली; भारताने केली या संघाच्या विक्रमाशी बरोबर

तिसऱ्या कसोटीत रोहित शर्मा खेळणार का? रहाणेनं दिले संकेत

 विजयानंतरचं रहाणेचं ट्विट ठरतेय चर्चेचा विषय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 11:29 am

Web Title: india vs australia ravindra jadeja joins ms dhoni and virat kohli to achieve impressive feat for india nck 90
Next Stories
1 “चांगली लोकं नेहमी…”, सौरव गांगुलीकडून मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचं कौतुक
2 शुबमनचा फॅन झाला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज, म्हणाला…
3 सिडनी कसोटीसाठी रोहितचा भारतीय संघात सहभाग निश्चीत नाही, शास्त्री गुरुजींचे सूचक संकेत
Just Now!
X