पहिल्या कसोटी सामन्यातील दारुण पराभवनंतर भारतीय संघान फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेत दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ८ गड्यांनी पराभव केला. विराट कोहली आणि शमीच्या अनुपस्थितीत भारतीय संघानं केलेल्या पुनरागमनाचे सर्व आजी-माजी खेळाडू प्रभावित झाले आहेत. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही भारतीय संघाचं आणि अजिंक्य रहाणेचं कौतुक केलं आहे. ऑस्ट्रेलियावर आपल्या खास शैलीत टीकास्त्रही सोडलं आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय संघानं ऑस्ट्रलियाला पोत्यात घालून मारल्यासराखं हरवलं, असे अख्तर म्हणाला. जाडेजाची अष्टपैलू खेळी, सिराज आणि शुबमन गिलचं यशस्वी पदार्पणावरही शोएब अख्तर प्रभावित झाला आहे.

रोहित शर्मा, विराट कोहली आणि मोहम्मद शमीच्या अनुपस्थिती भारतीय संघानं दमदार प्रदर्शन केलं. ऑस्ट्रेलियाचा असा पराभव केला जसं एखाद्याला पोत्यात घालून मारलं जातं. भारतीय संघानं आपल्या खेळीच्या बळावर सर्वांची मनं जिंकली. रहाणेचं नेतृत्वही कमालीचं होतं, असं रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणाला.

अख्तर म्हणाला, ‘भारतीय संघात स्टार खेळाडू नव्हते. पण इतर खेळाडूंनी भारतीय संघाला अशक्यप्राय विजय मिळून दिला. भारतीय संघाची बेंच स्ट्रेंथ कमालीची आहे. विराट कोहलीसारखा खेळाडू नसल्याचा संघावर कोणताही परिणाम झाला आहे. ही कामगिरी पाहून एक खेळाडू म्हणून मला भारतीय संघाचा अभिमान वाटतोय.’ रहाणेच्या नेतृत्वानं अख्तर प्रभावित झाला आहे. तो म्हणाला की, ‘रहाणेने शांततेत नेतृत्व केलं. एकदम शांतपणे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात बदल केला. शांततेत नेतृत्व करणाऱ्या रहाणेच्या नेतृत्वचा जागतिक क्रिकेटमध्ये डंका वाजतोय.’

आणखी वाचा : 

धोनी दांपत्याने Mr and Mrs चहलसाठी होस्ट केली खास डिनर पार्टी; पाहा खास फोटो 

विजयी शॉट अन् राहणेनं केली राहुल द्रविडची बरोबरी

वर्षाचा शेवट गोड, ‘त्या’ पराभवाचा घेतला बदला

३१ वर्षांनंतर भारतीय गोलंदाजांसमोर कांगारुंनी नांगी टाकली; भारताने केली या संघाच्या विक्रमाशी बरोबर

तिसऱ्या कसोटीत रोहित शर्मा खेळणार का? रहाणेनं दिले संकेत

 विजयानंतरचं रहाणेचं ट्विट ठरतेय चर्चेचा विषय