21 February 2019

News Flash

Ind vs Eng 5th test – Live : पहिला दिवस भारताचा; दिवसअखेर इंग्लंड ७ बाद १९८

India vs England 5th test Day 1 - भारताकडून इशांत शर्माने ३ तर बुमराह आणि जडेजाने २-२ बळी टिपले.

India vs England 5th test : भारत इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि अंतिम कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर इंग्लंडने कासवाच्या गतीने खेळ करत ७ बाद १९८ धावा केल्या. पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात इंग्लंडने सामन्यावर पकड मिळवली होती. पण चहापानानंतर मात्र भारताने सहा बळी टिपत इंग्लंडला संकटात टाकले. इंग्लंडकडून आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या कुकने सर्वाधिक ७७ आणि मोईन अलीने ५० धावा केल्या. भारताकडून इशांत शर्माने ३ तर बुमराह आणि जडेजाने २-२ बळी टिपले.

लंडनमध्ये सुरू असलेल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कूक आणि जेनिंग्स यांनी इंग्लंडला अर्धशतकी सलामी मिळवून दिली. पण त्यानंतर पहिल्या सत्रात सलामीवीर जेनिंग्स २३ धावांवर माघारी परतला. दुसऱ्या सत्रात मात्र भारताला एकही गडी बाद करता आला नाही. आपला शेवटचा सामना खेळणाऱ्या अॅलिस्टर कूकने मालिकेतील पहिले अर्धशतक ठोकले. तो ७१ धावांवर बाद झाला. लगेचच कर्णधार जो रूट आणि पाठोपाठ बेअरस्टो शून्यावर तंबूत परतले. स्टोक्सने (११) काही काळ मोईन अलीला साथ दिली. पण तोदेखील पायचीत झाला. काही वेळाने १६७ चेंडूत अर्धशतकी चिवट खेळी करणारा मोईन अली बाद झाला. सॅम कुर्रानलाही भोपळा फोडता आला नाही. सध्या बटलर ११ तर रशीद ४ धावांवर खेळत आहे.

दरम्यान, चौथा सामना जिंकून इंग्लंडने मालिका ३-१ने खिशात घातली आहे. पण आपली विजयी लय कायम राखण्यासाठी इंग्लंडचा संघ प्रयत्नशील आहे. तर दुसरीकडे दीर्घ अशा इंग्लंड दौऱ्यातील हा शेवटचा सामना असल्याने दौऱ्याचा शेवट गोड करण्याची भारताला संधी आहे. त्यामुळे या कसोटीसाठी हनुमा विहारीचे पदार्पण होणार आहे. तो भारताचा २९२वा खेळाडू कसोटीपटू ठरला आहे.

लोकसत्ता समालोचन

Live Blog

Highlights

  • 20:19 (IST)

    अखेरच्या सामन्यात कूकने ठोकले अर्धशतक, चहापानापर्यंत इंग्लंड १ बाद १२३

    दुसऱ्या सत्रात भारताला एकही गडी बाद करता आला नाही. मात्र आपला शेवटचा सामना खेळणाऱ्या अॅलिस्टर कूकने मालिकेतील पहिले अर्धशतक ठोकले.

  • 17:33 (IST)

    इंग्लंडची संथ सुरूवात, उपहारापर्यंत १ बाद ६८

    नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या संघाने उपहारापर्यंत १ बाद ६८ अशी संथ सुरूवात केली आहे. पहिल्या सत्रात एकमेव बळी जडेजाने टिपला. 

23:01 (IST) 07 Sep 2018
पहिला दिवस भारताचा; दिवसअखेर इंग्लंड ७ बाद १९८

पहिला दिवस भारताचा; दिवसअखेर इंग्लंड ७ बाद १९८

22:26 (IST) 07 Sep 2018
मोईन अली पाठोपाठ सॅम कुर्रानही बाद, द्विशतकाआधीच इंग्लंडचे ७ गडी तंबूत

मोईन अली पाठोपाठ सॅम कुर्रानही बाद, द्विशतकाआधीच इंग्लंडचे ७ गडी तंबूत

22:21 (IST) 07 Sep 2018
चिवट खेळीनंतर मोईन अली बाद, १६७ चेंडूत केले होते अर्धशतक

चिवट खेळीनंतर मोईन अली बाद, १६७ चेंडूत केले होते अर्धशतक

22:17 (IST) 07 Sep 2018
मोईन अलीची चिवट खेळी, १६७ चेंडूत केले अर्धशतक

मोईन अलीची चिवट खेळी, १६७ चेंडूत केले अर्धशतक

22:05 (IST) 07 Sep 2018
इंग्लंडचा निम्मा संघ माघारी, बेन स्टोक्स तंबूत

इंग्लंडचा निम्मा संघ माघारी, बेन स्टोक्स तंबूत

21:05 (IST) 07 Sep 2018
भारताचं दमदार 'कमबॅक'; रूट आणि बेअरस्टो शून्यावर बाद

भारताचा दमदार 'कमबॅक'; रूट आणि बेअरस्टो शून्यावर बाद

20:58 (IST) 07 Sep 2018
कुक पाठोपाठ कर्णधार जो रूट बाद, इंग्लंडला तिसरा धक्का

कुक पाठोपाठ कर्णधार जो रूट बाद, इंग्लंडला तिसरा धक्का

20:54 (IST) 07 Sep 2018
इंग्लंडची जमलेली जोडी फुटली, कूक ७१ धावांवर तंबूत

इंग्लंडची जमलेली जोडी फोडण्यात भारताला यश आले. आपला शेवटचा सामना खेळणारा अॅलिस्टर कूक पहिल्या डावात ७१ धावांवर तंबूत परतला.

20:19 (IST) 07 Sep 2018
अखेरच्या सामन्यात कूकने ठोकले अर्धशतक, चहापानापर्यंत इंग्लंड १ बाद १२३

दुसऱ्या सत्रात भारताला एकही गडी बाद करता आला नाही. मात्र आपला शेवटचा सामना खेळणाऱ्या अॅलिस्टर कूकने मालिकेतील पहिले अर्धशतक ठोकले.

19:31 (IST) 07 Sep 2018
अखेरच्या सामन्यात कूकला सूर गवसला, ठोकले अर्धशतक

अखेरच्या सामन्यात कूकला सूर गवसला, ठोकले अर्धशतक

17:33 (IST) 07 Sep 2018
इंग्लंडची संथ सुरूवात, उपहारापर्यंत १ बाद ६८

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या संघाने उपहारापर्यंत १ बाद ६८ अशी संथ सुरूवात केली आहे. पहिल्या सत्रात एकमेव बळी जडेजाने टिपला. 

17:13 (IST) 07 Sep 2018
अर्धशतकी भागीदारीनंतर इंग्लंडला पहिला धक्का, जेनिंग्स माघारी

अर्धशतकी भागीदारीनंतर इंग्लंडला पहिला धक्का बसला. सलामीवीर जेनिंग्स २३ धावांवर माघारी परतला. रवींद्र जडेजाला मिळाला पहिला बळी.

16:49 (IST) 07 Sep 2018
इंग्लंडची संयमी सुरूवात, कूक-जेंनिंग्स जोडीची अर्धशतकी भागीदारी

इंग्लंडची संयमी सुरूवात, कूक-जेंनिंग्स जोडीची अर्धशतकी भागीदारी

15:13 (IST) 07 Sep 2018
इंग्लंडच्या संघात बदल नाही, भारताच्या संघात २ बदल

भारताच्या संघात २ बदलविहारी, जडेजाला संधी

इंग्लंडच्या संघात बदल नाही

15:05 (IST) 07 Sep 2018
नाणेफेक जिंकून इंग्लंडचा फलंदाजीचा निर्णय

मालिकेत पाचव्यांदा इंग्लंडने नाणेफेक जिंकली. इंग्लंडचा प्रथम फलंदाजीचा निर्णय.

14:57 (IST) 07 Sep 2018
हनुमा विहारीचे कसोटी पदार्पण

पाचव्या कसोटीसाठी हनुमा विहारीचे पदार्पण होणार आहे. तो भारताचा २९२वा खेळाडू कसोटीपटू ठरला आहे.

First Published on September 7, 2018 2:53 pm

Web Title: india vs england 5th test 2018 score wickets live cricket updates online oval london 2