दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत भारतासमोर पाकिस्तानचं आव्हान असणार आहे. मंगळवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी समोरासमोर येतील. यंदाच्या स्पर्धेत दोन्ही संघाची कामगिरी वाखणण्याजोगी राहिलेली आहे. एकही सामना न गमावता दोन्ही संघ उपांत्य फेरीत दाखल झालेले आहेत. उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानने अफगाणिस्तानवर तर भारताने ऑस्ट्रेलियावर मात करत, उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं.

अवश्य वाचा – U-19 World Cup Ind vs Pak : उपांत्य सामन्याआधी पाक सलामीवीराचं मोठं विधान, म्हणाला…

मात्र या दोन्ही संघांमध्ये विजयाची संधी कोणाला आहे?? १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आतापर्यंत ९ वेळा समोरासमोर आलेले आहेत. यापैकी ६ वेळा पाकिस्तानने विजय मिळवला असून ३ वेळा भारतीय संघ विजयी झाला आहे. त्यामुळे उपांत्य सामन्यात पाकिस्ताशी बरोबरी करण्याची संधी प्रियम गर्गच्या भारतीय संघाकडे असणार आहे.

१९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्यांचा इतिहास –

  • भारत विरुद्ध पाकिस्तान ( १९८८ ची स्पर्धा ) – पाकिस्तान ६८ धावांनी विजयी
  • भारत विरुद्ध पाकिस्तान ( १९९८ ची स्पर्धा ) – पाकिस्तान ५ गडी राखून विजयी
  • भारत विरुद्ध पाकिस्तान ( २००२ ची स्पर्धा ) – पाकिस्तान २ गडी राखून विजयी
  • भारत विरुद्ध पाकिस्तान ( २००४ ची स्पर्धा ) – उपांत्य फेरीत पाक ५ गडी राखून विजयी
  • भारत विरुद्ध पाकिस्तान ( २००६ ची स्पर्धा ) – अंतिम फेरीत पाक ३८ धावांनी विजयी
  • भारत विरुद्ध पाकिस्तान ( २०१० ची स्पर्धा ) – उपांत्यपूर्व फेरीत पाक २ गडी राखून विजयी
  • भारत विरुद्ध पाकिस्तान ( २०१२ ची स्पर्धा ) – उपांत्यपूर्व फेरीत भारत १ गडी राखून विजयी
  • भारत विरुद्ध पाकिस्तान ( २०१४ ची स्पर्धा ) – भारत ४० धावांनी विजयी
  • भारत विरुद्ध पाकिस्तान ( २०१८ ची स्पर्धा ) – भारत २०३ धावांनी विजयी