News Flash

LIVE: दक्षिण आफ्रिकेपुढे ४५७ धावांचे आव्हान

भारत-दक्षिणआफ्रिका कसोटी सामन्यात चौथ्या दिवसात भारताने दुस-या डावात ४२१ धावा केल्या आहेत.

| December 21, 2013 03:12 am

भारत-दक्षिणआफ्रिका कसोटी सामन्यात चौथ्या दिवसात भारताने दुस-या डावात ४२१ धावा केल्या आहेत. भारताकडे सध्या ४५७ धावांनी आघाडी आहे. भारताने दुस-या डावात दक्षिण आफ्रिकेसमोर ४५७ धावांचे आव्हान ठेवले आहे.
चौथ्या दिवशी खेळाला सुरुवात झाल्यानंतर सकाळच्या सत्रात चेतेश्वर पूजाराने दीडशतक झळकवले.  दुस-या डावात भारताला भक्कम आघाडी मिळवून देणारा  चेतेश्वर पूजारा (१५३) धावांवर बाद झाला त्यापाठोपाठ रोहित शर्माही (६) धावांवर बाद झाला. दोघांना कॅलिसने बाद केले.  त्यानंतर विराट कोहली (९६) धावांवर बाद झाला. जे.पी. डुयूमिनीने त्याला डिव्हीलियर्सकरवी झेलबाद केले. विराटचे दुसरे शतक अवघ्या चार धावांनी हुकले. दुस-या डावात केलेल्या ४२१ धावांमुळे  भारताने या सामन्यावर आपली पकड कायम ठेवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2013 3:12 am

Web Title: india vs south africa 1st test live score pujara kohli continue assault
टॅग : India Vs South Africa
Next Stories
1 इशांतचा अंकुश !
2 लीग चषक फुटबॉल स्पर्धा : मँचेस्टर युनायटेड उपांत्य फेरीत
3 राजस्थान क्रिकेट असोसिएशन निवडणुक : ललित मोदी यांना विजयाची खात्री; निकाल ६ जानेवारीला
Just Now!
X