19 February 2020

News Flash

ब्रायन लाराला मागे टाकत विराटचा विंडीजमध्ये विक्रम

दुसऱ्या वन-डे विराटची १२० धावांची खेळी

वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. विराटने १२५ चेंडूत १२० धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. या खेळीसह विराटने वन-डे क्रिकेटमध्ये माजी विंडीज कर्णधार ब्रायन लाराला मागे टाकत आणखी एक विक्रम आपल्या नावे जमा केला आहे.

वेस्ट इंडिजमध्ये वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे कर्णधार –

१) विराट कोहली विरुद्ध वेस्ट इंडिज – (पोर्ट ऑफ स्पेन, २०१९) – १२० धावा

२) ब्रायन लारा विरुद्ध श्रीलंका – (ब्रिजटाऊन, २००३) – ११६ धावा

३) महेला जयवर्धने विरुद्ध न्यूझीलंड – (किंग्जस्टन, २००७) – नाबाद ११५ धावा

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताची सुरुवात खराब झाली. शिखर धवन स्वस्तात माघारी परतल्यानंतर, विराटने सर्वात आधी रोहित शर्मासोबत अर्धशतकी आणि त्यानंतर श्रेयस अय्यरसोबत शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. विराटचं वन-डे क्रिकेटमधलं हे ४२ वं शतक ठरलं.

अवश्य वाचा – Ind vs WI : रिकी पाँटींगला मागे टाकत विराट कोहली ठरला यशस्वी कर्णधार

First Published on August 12, 2019 10:04 am

Web Title: india vs west indies virat kohli scripts record with ton in trinidad topples brian lara psd 91
Next Stories
1 Ind vs WI : सचिन-सेहवागला मागे टाकत विराट-रोहित जोडी ठरली अव्वल
2 Video : जरुर पाहा, आपल्याच गोलंदाजीवर भुवनेश्वर कुमारचा एका हातात झेल
3 ‘आयसीसी’च्या नियमाला ‘बीसीसीआय’चा आक्षेप!
Just Now!
X