मेडेलिन, कोलंबिया येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला तिरंदाजी संघाने चीनवर मात करत पहिले सुवर्णपदक पटकावले आहे. अंतिम सामन्यात भारतीय संघाने चीनला २०१-१८६ अशा फरकाने धूळ चारली.
दीपिका कुमारी, लैश्राम बॉम्बायला देवी आणि रिमिल बिरल्य या तिरंदाजी खेळाडूंचा भारतीय महिला तिरंदाजी संघात समावेश होता. भारतीय संघाचे नेतृत्व दीपिका कुमारीने उत्कृष्टरित्या सांभाळले आणि अंतिम सामन्यात कर्णधारी कामगिरी बजावली. 
अंतिम लढतीत भारतीय संघाने अव्वल मानांकित आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेत्या जिंग झ्यू, मिंग चेंग यांचा पराभव केला.
तिरंदाजी विश्वचषकात सुवर्णपदक पटकावण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे.